संजय राऊत  Sakal
महाराष्ट्र बातम्या

येड्या गबाळ्यांपुढे झुकणार नाही : संजय राऊत

महाराष्ट्रातील आघाडी सरकार पाडण्याच्या भाजप नेत्यांच्या वक्तव्याचाही राऊत यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘महाविकास सरकार पाडण्याच्या कितीही धमक्या दिल्या तरी शिवसेना आणि महाराष्ट्र अशा येड्या गबाळ्यांपुढे झुकणार नाही,’’ अशा शब्दात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला फटकारले आहे. १० मार्चनंतर महाराष्ट्रातील सरकार पडणार असल्याचे भाकीत वर्तवणाऱ्यांना आपल्या शुभेच्छा आहेत, असा टोलाही त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना लगावला.

महाराष्ट्रातील आघाडी सरकार पाडण्याच्या भाजप नेत्यांच्या वक्तव्याचाही राऊत यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार नेते महाराष्ट्राचा कणा आहेत. कोणी कितीही दबाव आणला तरी शिवसेना झुकणार नाही, असे राऊत ठणकावले. सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) छळ केला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून केला आहे.

त्यावर भाजपकडून राऊत यांच्यावर टीका झाली होती. याला उत्तर देताना राऊत जनतेसमोर सत्य मांडण्याचा अधिकार मला आहे. ‘ईडी’च्या आरोपांप्रकरणी आपण न्यायालयात बोलणारच आहे. पण मुंबईत पत्रकारच परिषद घेऊन यावर बोलणार असल्याचे सूतोवाच राऊत यांनी केले होते.

‘आघाडीच्या नेत्याबरोबर प्रवीण राऊतांचे व्यवहार’

मुंबई ः आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आलेले व्यावसायिक प्रवीण राऊत यांनी आघाडीच्या एका नेत्याबरोबर आर्थिक व्यवहार केले आहेत आणि अनेक बड्या व्यक्तींसाठी ते अशी कामे करतात, असा खळबळजनक दावा बुधवारी विशेष न्यायालयात सक्तवसुली संचालनालय (ईडी)च्या वतीने करण्यात आला. राऊत यांना २ फेब्रुवारी रोजी ‘ईडी’ने अटक केली. विशेष पीएमएलए न्यायालयात रिमांडसाठी त्यांना बुधवारी (ता.९) हजर केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: स्मशानातील लाकडांवर रक्ताचे डाग; दोघांनी मिळून केला होता खून, पोलिसांनी 'असा' लावला छडा

'ही' नक्कल केल्यामुळे महाराष्ट्रात भाजपचा विजय झाला; कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमारांनी सांगितलं कारण

Solapur South Assembly Election Result 2024 : आघाडीतील बिघाडी ठरली ‘दक्षिण’च्या यशाची गुरूकिल्ली

MLA Chetan Tupe Patil : हडपसर विधानसभा नवनिर्वाचित आमदार चेतन तुपे पाटील विकासाचे ‘रोल मॉडेल’ पुढे आणणार

Vijay Rashmika Viral Photos : विजय-रश्मिकाच्या रिलेशनशिपचे गुपित उघड? रेस्टॉरंटमध्ये दोघेही एकत्र जेवताना दिसले

SCROLL FOR NEXT