Santosh Bangar Marathi News Santosh Bangar Marathi News
महाराष्ट्र बातम्या

संतोष बांगर म्हणाले, उद्धव ठाकरे प्रामाणिक; पण...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरही शिवसेनेच्या दोन गटांमध्ये शाब्दिक युद्ध सुरूच आहे. ‘उद्धव साहेब (Uddhav Thackeray) खूप प्रामाणिक आणि मनमिळाऊ आहेत. परंतु, त्यांच्या आजूबाजूचे लोक खूप खोडकर आहेत’ असे हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) म्हणाले. ‘चहापेक्षा किटली गरम’ असे म्हणत संजय राऊत (sanjay Raut) यांचे नाव न घेता बांगर यांनी निशाणा साधला. (Santosh Bangar Marathi News)

शिंदे गट आणि भाजप सरकार स्थापनेनंतर आमदार संतोष बांगर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी उघडपणे बोलले आहे. त्यांनी सरकार स्थापनेपूर्वीच्या हालचालींवरही भाष्य केले. उद्धव ठाकरे आम्हाला खरी माहिती देण्याचे टाळायचे. महाविकास आघाडी सरकार हे अनैसर्गिक सरकार होती. हे सरकार जनतेच्या मनात नव्हते. भाजप-शिवसेना (Shiv sena) युती झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली असेल, असे संतोष बांगर (Santosh Bangar) म्हणाले.

एकेकाळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव घेणाऱ्या संतोष बांगर यांनी या काळात अनेकवेळा एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले. सुमारे पाच मिनिटे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संतोष बांगर यांनी अनेकवेळा एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले. माझ्या मतदारसंघातील कामे मार्गी लावण्यासाठी एकनाथ भाऊ ५० कोटींहून अधिक निधी देतील, असा विश्वास बांगर यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

आपापल्या उमेदवारांसाठी ‘हे’ १७ बडे नेते सोलापुरात! पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, शरद पवार, योगी, रेवंथ रेड्डी, सिद्धरामय्या, उद्धव व राज ठाकरे, ओवैसी यांच्या प्रचारसभा, वाचा...

कौटुंबिक वारसा जपताना...

SCROLL FOR NEXT