Satara Latest Marathi News, Satara News 
महाराष्ट्र बातम्या

Wow Good News! आता मोबाइलमध्ये करता येणार 'मतदान कार्ड' डाउनलोड; ही आहे सोपी पध्दत..

Balkrishna Madhale

सातारा : देशातील प्रशासनात लोकांचा सहभाग वाढवणे, ते अधिक पारदर्शी बनवणे, शासनाकडून लोकांना मिळणारा प्रतिसाद वाढवणे व ते अधिक लोकाभिमुख करणे अशा उद्देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने १ जुलै रोजी देशात ‘डिजिटल इंडिया’ अभियानाची सुरुवात केली. दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडिअममधून त्याचे उद्घाटन झाले. हे सांगण्याचे कारण म्हणजे, आपल्या देशात डिजिटल प्रणालीचा वेगाने होणारा प्रचार-प्रसार, विविध क्षेत्रात झालेली डिजिटल इंडियाची प्रगती यावरुन 'अवघे जग मुठीत' आले आहे. 

आज डिजिटल इंडियात एक एक पाऊल पुढे टाकले जात आहे. विविध सुविधा एका छता खाली येण्यासाठी वारंवार प्रयत्न करण्यात येत आहेत, त्यामुळे देशात डिजिटल प्रणालीचा वेगवान प्रभाव दिसू लागला आहे. आपल्या देशात मतदानाला फार मोठे महत्व प्राप्त आहे. देशात सर्वात गरीब आणि श्रीमंत व्यक्तीला देखील   तितकाच मतदानाचा समान हक्क आपल्या राज्यघटनेने बहाल केला आहे. त्यामुळे आपल्या मतदान प्रक्रियेत वारंवार बदल करुन सरकारकडून विश्वासहर्ता जपण्याचा प्रयत्न केला जात आहे. या डिजिटल इंडियात ओळख पत्र (वोटर कार्ड) आता स्मार्ट होताना दिसत असून मोबाइल फोन किंवा कम्प्यूटरवर डाउनलोड करता येऊ शकते. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ई-इलेक्ट्रिक फोटोचे आता डिजिटल लॉकर सारख्या माध्यमाप्रमाणे सुरक्षित ठेवले जाऊ शकते. तसेच याला पोर्टेबल डॉक्यूमेंट फॉर्मेटमध्ये (पीडीएफ) मुद्रित केले जाऊ शकते. याचा प्रभाव आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायविंग लायसन्स डिजिटल मोडमध्ये उपलब्ध आहेत, त्यामुळे या स्मार्ट प्रणालीचा उपयोग लाभदायक ठरणार आहे. 

आयोगाने, आता वोटर कार्डसुद्धा डिजिटल मोडमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. मोबाइलमध्ये वोटर कार्ड डाउनलोड करण्याची ही सुविधा दोन टप्प्यात मिळणार असून पहिल्या टप्प्यात म्हणजेच २५ ते ३१ जानेवारी दरम्यान केवळ नवीन मतदारांनी ही डिजिटल वोटर कार्ड डाउनलोड करता येऊ शकणार आहे. परंतु, यासाठी त्यांचा मोबाइल नंबर निवडणूक आयोगासोबत नोंदणीकृत असायला हवा, त्याशिवाय या प्रणालीचा वापर करता येणार नाही. दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच १ फेब्रुवारी पासून सर्व वोटर्स आपल्या वोटर आयडी कार्डला डिजिटल रुपात डाउनलोड करू शकतात. यासाठी सुद्धा मोबाइल नंबर निवडणूक आयोगाच्या वेबसाइट सोबत रजिस्टर असायला हवा. हे काम तुम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर जाऊन करू शकतात, तसे केल्यास तत्काळ त्याचा रिझल्ट शक्य आहे.

महत्वाचे : वोटर कार्डची डिजिटल कॉपीला डाउनलोड करण्यासाठी तुम्ही दोन पद्धतीचा वापर करू शकतात. पहिला म्हणजे मोबाइल अॅप (Voter Helpline) आणि दुसरा म्हणजे निवडणूक आयोगाची वेबसाइटवरून करू शकतात. जर तुमच्या फोनमध्ये अॅप नसेल तर तो अॅप डाउनलोड करावा लागेल किंवा आयोगाच्या वेबसाइटवर जाऊन तुमचा मोबाइल नंबर ई-मेल आयडीवरून लॉग इन करावे लागेल. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला Download e-EPIC हा पर्याय दिसेल. त्यानंतर मोबाइल नंबर किंवा वोटर कार्ड नंबर टाकून तुम्ही पीडीएफमध्ये आपले मतदान ओळखपत्र (वोटर कार्ड) डाउनलोड करू शकता. पीडीएफ फाइलमध्ये एक क्यूआर कोड दिसेल. त्याला स्कॅन केल्यानंतर पूर्ण डिटेल्स तुम्हाला दिसेल, त्यामुळे आपले कार्ड सुरक्षित राहण्यास ही मदत होणार आहे.

1. मोबाइल अॅप (Voter Helpline)

2. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटचा वापर करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT