कऱ्हाड ः शासन विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती देते. विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर शिक्षकांची संख्या अवलंबून असते. शासनाकडून विद्यार्थ्यांना आहाराचेही वाटप केले जाते. शासकीय योजना, शिष्यवृत्तीचा लाभ प्रत्यक्ष विद्यार्थ्याला मिळतो आहे किंवा नाही, याची खातरजमा करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची खरी आकडेवारी समोर यावी, यासाठी आता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी नव्याने केली जाणार आहे. त्यासाठीची कार्यवाही सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाकडून आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
Video : जगात भारी, सातारच्या प्रद्युम्नची घोडे सवारी
विद्यार्थ्यांची पटसंख्या जरी नोंदवली जात असली तरी त्याची आधार कार्डावरून थेट खातरजमा केली जात नव्हती. त्यामुळे शासकीय योजनांचा, शिष्यवृत्तीचा लाभ प्रत्यक्ष मिळतो आहे किंवा नाही, याची पडताळणी होत नव्हती. त्याचाच विचार करून शिक्षण विभागाने आता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आधार कार्डाची नोंदणी शिक्षण विभागाकडे करण्याची नवी मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने कार्यवाही सुरू करण्याचा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांचा नव्याने डाटा गोळा करण्याचे काम शिक्षण विभागाकडून सूर आहे. त्याचबरोबर संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार कार्डचे आयडेंटीफिकेशन कसे करायचे, यासंदर्भातीलही कार्यवाही सुरू आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस इन ऍक्शन, रेमडिसिव्हर इंजेक्शन चोरीचे कोणास इंफेक्शन?
करुन दाखवलं : स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत कऱ्हाड पालिका देशात अव्वल, सलग दुसऱ्या वर्षी यश
...अशी होईल नोंदणी
विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरण करण्यासाठी राज्यात 816 आधार नोंदणी संच आणि 816 आधार नोंदणी ऑपरेटरची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याव्दारे राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या पहिली ते 12 वी पर्यंतच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणीचे व अद्ययावतीकरणाचे काम सुरू केले जाणार आहे. त्यासाठीची जबाबदारी माध्यमिक विभागाच्या शिक्षणांधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. त्यांना प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मदत करणार आहेत. पंचायत समित्यांनाही या मोहिमेत समाविष्ट करून घेण्यात येणार आहे.
सुशांतच्या मृत्युनंतर चर्चेत असलेल्या मिस्ट्री गर्लचा झाला खुलासा
नोंदणी आणि दुरुस्तीही
पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी ही शिक्षण विभागाकडे करायची आहे. त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांची आधारकार्ड नाहीत, त्यांची नव्याने नोंदणी केली जाणार आहे. त्याचबरोबर ज्यांच्या पत्त्यात, नावात, जन्मतारखेत बदल करायचा आहेत, त्याचीही दुरुस्ती या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांना करता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही एक संधीच असणार आहे.
कॅबिनेटच्या बैठकीत याची चर्चाच नाही, राजू शेट्टींसह राज्यातील आंदाेलकांचा हिरमाेड
""आधार कार्डवरून विद्यार्थी लगेच व्हेरिफाय होतो. त्यासाठी शासनाकडून पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नोंदणी व अद्ययावतीकरणाची मोहीम हाती घेण्यात येत आहे. त्यासाठीची कार्यवाही शिक्षण विभागाकडून सुरू आहे.''-प्रभावती कोळेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सातारा .
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.