महाराष्ट्र बातम्या

विद्यार्थी, पालकहाे वह्या, पुस्तक घेण्यापुर्वी हे वाचा

सचिन देशमुख

कऱ्हाड : शिक्षण क्षेत्रात शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रश्‍न सातत्याने ऐरणीवर आला आहे. त्यावर शासनासह अनेक संस्था, शाळांनीही उपाययोजना केल्या आहेत. मात्र, येत्या शैक्षणिक वर्षापासून शासनाने एकात्मिक पुस्तकचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी यावर्षीपासून राज्यात प्रत्येक जिल्ह्यातील एका तालुक्‍यात प्रायोगिक तत्त्वावर एकात्मिक पुस्तकाचा पायलट प्रोजेक्‍ट राबवला जाणार आहे. त्यामुळे या तालुक्‍यातील शालेय विद्यार्थ्यांना दप्तरात यंदा एक पुस्तक, एक वही यांचाचा भार पेलावा लागणार आहे. सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्‍याची निवड झाली आहे.


कोरोनाचे संकट असतानाही शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. त्यासाठी शासनस्तरावर विद्यार्थ्यांना वेळेत पाठ्यपुस्तके मिळावीत, याचेही प्रयत्न सुरू आहेत. सध्या तरी शाळा केव्ही सुरू होणार याबाबत संभ्रमावस्था असली, तरी शिक्षण विभागाने मात्र, जय्यत तयारी केली आहे. कोरोनाच्या संकट काळातही शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याचा कायम ऐरणीवर असणारा प्रश्‍न सोडवण्याच्या दृष्टीने विचार केल्याचे दिसून येते. त्यासाठी राज्यात प्रायोगिक तत्त्वावर हा पायलट प्रोजेक्‍ट राबवण्याचा निर्णय झाला आहे. प्रत्येक जिल्ह्यातील एक तालुका याप्रमाणे राज्यातील 36 तालुक्‍यांत या शैक्षणिक वर्षापासून एकात्मिक पुस्तक हा उपक्रम राबवण्याचा निर्णय झाला आहे. जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्‍यात हा पायलट प्रोजेक्‍ट राबवला जाणार आहे. यामध्ये एकात्मिक पुस्तकात सर्वच विषयांचा समावेश असल्याने विद्यार्थ्यांना सर्व विषयाची स्वतंत्र पुस्तके दप्तरातून वागवावी लागणार नाहीत. त्यामुळे एक पुस्तक व एक वहीचे ओझे दप्तरात असेल, असे शासनाचे नियोजन आहे. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझेही कमी होण्यास मदत होणार आहे. राज्यात यावर्षी हा पायलट प्रोजेक्‍ट यशस्वी झाल्यास तो राज्यातील सर्वच तालुक्‍यांत राबवण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. सध्या तरी पायलट प्रोजेक्‍टसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एक यानुसार 36 तालुक्‍यांतील विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तराचे ओझे कमी करण्याचा विचार आहे. 

एकात्मिक पुस्तक 

विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाला असणाऱ्या सर्व विषय एकाच पुस्तकात असतील. पहिल्या तिमाहीत एकाच पुस्तकाच गणित, मराठी, इंग्रजी व अन्य विषयासाठी एक पुस्तक असेल. त्यामुळे सगळ्या विषयांचे एक पुस्तक व एक वही इतकेच ओझे त्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात असेल. पहिल्या तिमाहीचा अभ्यासक्रम संपला, की ते घरी ठेऊन विद्यार्थ्यांला दुसऱ्या तिमाहीचे एकात्मिक पुस्तक शाळेत आणावे लागणार आहे. 

शालेय विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शिक्षण विभागाने एकात्मिक पुस्तक हा उपक्रम यंदापासून हाती घेतला आहे. सातारा जिल्ह्यात पायलट प्रोजेक्‍टसाठी कोरेगाव तालुक्‍याची निवड झाली असून, त्यानुसार यंदा या तालुक्‍यात एकात्मिक पुस्तक येतील. 
- प्रभावती कोळेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सातारा. 


राज्यातील शिक्षकांपुढे आता मान्यतेचे आव्हान 

Video : पालकांनाे, अशी घ्या आपल्या मुलांची काळजी

वाद घालणाऱ्या शिक्षकांच्या होणार बदल्या

गोंदवले : उघड दार देवा आता...छाेट्या विक्रेत्यांची आर्त हाक

प्रवासाचा ई - पास काढताना हा अनुभव आला तर आम्हांला जरुर कळवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

दारूच्या नशेतच कपूर परिवाराला पहिल्यांदा भेटली संजय कपूरची बायको ; म्हणाली "ड्रिंक्स करताना त्याने प्रपोज केलं"

SCROLL FOR NEXT