महाराष्ट्र बातम्या

ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांचं निधन

सकाळ वृत्तसेवा

मराठीतील प्रख्यात कवी, संपादक व सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचं शुक्रवारी निधन झालं आहे. ते 78 वर्षांचे होते. पेण येथील राहत्या घरी झटक्यानत्यांनी अखेरचा श्वास घेतला. झोपेत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. काळसेकर यांच्या निधनामुळे नवोदित लेखक, कवींचा हक्काचा मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहेत.

वेंगुर्ल्यातील काळसे या गावात काळसेकर यांचा जन्म झाला आहे. सिंधुदुर्गातच त्याचं शालेय शिक्षण झालं तर मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर काही काळ त्यांनी ज्ञानदूत व टाइम्स ऑफ इंडियामध्ये नोकरी केली. काळसेकर यांची काव्य लेखनातून वाङ्‌मयीन कारकिर्दीला सुरुवात झाली. सुरुवातीला महाविद्यालयाच्या नियतकालिकातून, नवाकाळ, मराठा यांसारख्या वर्तमानपत्रातून कविता प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर विविध वाङ्‌मयीन नियतकालिकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या. 1971मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह इंद्रियोपनिषद् प्रकाशित झाला होता. या कविता संग्रहानं त्यांना साहित्य वर्तुळात ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी साहित्याच्या क्षेत्रात चौफेर मुशाफिरी केली. कविता, अनुवाद, गद्य असे वेगवेगळे साहित्य प्रकार हाताळले. 'वाचणाऱ्याची रोजनिशी' या त्यांच्या पुस्तकाला 2014 मध्ये 'साहित्य अकादमी' पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: सभा आटपून निघाले, पोलिसांच्या ताफ्यात दिसला जुना मित्र, गाडी थांबवली अन्... मोहोळ यांच्या कृतीची सर्वत्र चर्चा

Women's T20 World Cup 2024: भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने कर्णधार बदलली, निर्णायक सामन्यासाठी असे आहेत 'प्लेइंग-११'

कंपनी असावी तर अशी! दिवाळीचं गिफ्ट म्हणून कर्मचाऱ्यांना वाटल्या बाईक अन् मर्सिडीज, टाटा-मारुतीच्या गाड्या

भारताच्या अहिका-सुतिर्थाने रचला इतिहास; Asian Table Tennis Championships स्पर्धेत जिंकले पहिले दुहेरी पदक

Bee Attack : किल्ले राजगडावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला, पंचवीस ते तीस पर्यटक किरकोळ जखमी

SCROLL FOR NEXT