ssc exam 2023 exam center student kolhapur holl ticket issue education sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेचे ठरले वेळापत्रक; परीक्षेतील विद्यार्थ्यांची घोकंपट्टी थांबणार; आता परीक्षेत असणार क्षमताधिष्ठित प्रश्नांवर भर

विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण राहू नये, अभ्यासातील घोकंपट्टी थांबावी, यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेन तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा पाठ्यक्रम तयार केला आहे. तो आराखडा, मसुदा नागरिकांसाठी ऑनलाइन उपलब्ध करून त्यावर ३ जूनपर्यंत हरकती मागविल्या होत्या.

तात्या लांडगे

सोलापूर : विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण राहू नये, अभ्यासातील घोकंपट्टी थांबावी, यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा पाठ्यक्रम तयार केला आहे. तो आराखडा तथा मसुदा नागरिकांसाठी ऑनलाइन उपलब्ध करून त्यावर ३ जूनपर्यंत हरकती मागविल्या होत्या. आता तो आराखडा अंतिम करण्यात आला असून त्यात परीक्षेत क्षमताधिष्ठित प्रश्नांवर सर्वाधिक भर दिला आहे. सुरवातीला नववी ते अकरावीसाठी आणि त्यानंतर दहावी-बारावीसाठीही तो लागू होईल.

विद्यार्थ्यांना बदलत्या जगाची आव्हाने पेलण्यासाठी मानवी मूल्ये, जीवन कौशल्ये व नैतिकतेवर आधारित तार्किक विचार करणारे शिक्षण दिले जाणार आहे. तिसरी ते बारावीपर्यंतच्या परीक्षा दोन सत्रात होतील. नवीन आराखड्यात आरोग्य, कला व व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यात आला आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा आता कृतीतून ज्ञाननिर्मिती व ज्ञानवृद्धी हा त्यामागील हेतू आहे. इयत्ता तिसरीपासून व्यावसायिक शिक्षण, तिसरी ते आठवीसाठी व्यावसायिक कौशल्ये आणि नववीपासून विशेष व्यावसायिक शिक्षणाची सोय असणार आहे.

व्यावसायिक शिक्षणांतर्गत कृत्रिम बुद्धीमत्ता, मशिन लर्निंग, डाटा सायन्स, कृषी असे नावीन्यपूर्ण विषय असतील. आगामी शैक्षणिक वर्षापासून तो आराखडा दहावी-बारावी सोडून इतर वर्गांसाठी लागू होईल. त्यानंतर नवीन आराखड्यानुसार दहावी- बारावीच्या बोर्ड परीक्षेचा पॅटर्न बदलेल, अशी माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

बोर्ड परीक्षेत आता क्षमताधिष्ठित प्रश्न

पारंपारिक परीक्षा पद्धतीनुसार एखादा नियम विचारून किंवा प्रश्न विचारून त्यावर विद्यार्थ्यांकडून पाठांतर केलेले विस्तृत उत्तर लिहिणे अपेक्षित होते. मात्र, आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दहावी- बारावीच्या बोर्ड परीक्षेत क्षमताधिष्ठित प्रश्न सर्वाधिक असतील. एखादा विषय विद्यार्थ्यांना किती समजला, प्रत्यक्ष जीवनात तो त्या शिक्षणाचा वापर करतोय का, ही क्षमता पडताळली जाणार आहे. २०२५-२६ नंतर परीक्षा पद्धतीत हा बदल अपेक्षित आहे.

आगामी बोर्ड परीक्षा १० दिवस अगोदर

‘जेईई’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अभ्यासासाठी वेळ मिळावा, ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीत कमी गुण मिळालेल्यांना श्रेणीसुधारची संधी मिळावी, पुढील शिक्षणाच्या प्रवेशासाठी कोणतीही अडचण येवू नये म्हणून आगामी परीक्षा नेहमीपेक्षा १० दिवस अगोदर घेण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. त्यावर २३ ऑगस्टपर्यंत हरकती-सूचना मागविल्या होत्या. अंदाजे १० हजारांपर्यंत हरकती प्राप्त झाल्या असून बोर्डाकडून पुढील १० दिवसांत वेळापत्रक अंतिम केले जाणार आहे. तुर्तास बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च या काळात घेण्याचे नियोजित आहे.

हरकतींवरील निपटारा झाल्यावर अंतिम वेळापत्रक

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दहावी- बारावीची परीक्षा काही दिवस अलीकडे घेण्याचे नियोजित असून त्यावरील हरकती, सूचना पाहून बोर्डाकडून काही दिवसात अंतिम वेळापत्रक जाहीर केले जाईल.

- अनुराधा ओक, सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT