छत्रपती संभाजीनगर - पंधरा जूनपासून नवीन शैक्षणिक सत्राला सुरवात झाली आहे. परंतु, गतवर्षी शिक्षण घेत असलेल्या तब्बल ३५ लाख विद्यार्थ्यांचा शिक्षण विभागाला अद्याप शोध घेता आलेला नाही. राज्यातील अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या टीसीवर पेन क्रमांक (पर्मनंट एज्युकेशन नंबर) नोंदविला नसल्याने हा घोळ झाला आहे.
गेल्या वर्षभरात ३५ लाख ७८ हजार ७७३ विद्यार्थ्यांनी शाळा बदलल्या आहेत. त्यातील ४ लाख ६१ हजार ३१५ विद्यार्थी कुठे गेले, याचा हिशोब नुकताच यू-डायस प्लसमध्ये आलेला आहे. आता उरलेले ३१ लाख १७ हजार ४५८ विद्यार्थी कुठे गेले, याचा शोध लावण्याचे आव्हान शालेय शिक्षण विभागासमोर आहे.
शिक्षण विभागाने प्रत्येक विद्यार्थ्याला ११ अंकी पेन क्रमांक देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या क्रमांकानुसार देशभरातील कोणत्याही विद्यार्थ्याचा शैक्षणिक प्रवास शोधता येणार आहे. परंतु, शाळांनी तो नोंदविण्याकडे दुर्लक्ष केले.
त्यामुळे संबंधित विद्यार्थी पुढे कोणत्या शाळेत, महाविद्यालयात गेला त्याची यू-डायस प्लसमध्ये नोंद करणे कठीण झाले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा अहवाल महाराष्ट्र राज्य प्राथमिक परिषदेने जाहीर केला असून, त्यातील त्रुटी दूर करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
तीन लाख आधार बनावट
कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश दिल्यानंतर त्याची नोंद स्टुडंट पोर्टलवर आधार क्रमांकासह करावी लागते. परंतु, तब्बल तीन लाख एक हजार ९४५ विद्यार्थ्यांची नोंद बनावट आधार क्रमांकाद्वारे झालेली आहे.
पोर्टलवर नोंद - २,१२,८२,१४०, बनावट - ३,०१,९४५
मयत - १५८३, बारावीनंतर शाळा सोडलेले - ४१,६५०
इतर जिल्हा, देशात राज्यात गेले - ९५,९४०
अर्धवट शिक्षण सोडले - १,१६,१३७
आयटीआय, पॉलिटेक्निकला गेले - २८,३७३
अनियमित अभ्यासक्रमाला गेले - ८११९
मुक्त विद्यापीठाकडे वळले - २८२७
इतर जिल्हा, विभाग व राज्यात समावेश - ९५,०८४
बॉक्समध्येच आहेत. - ३५,७८,७७३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.