Nilam Gorhe  sakal
महाराष्ट्र बातम्या

Neelam Gorhe: महिला सुरक्षेसाठी पोलीस दक्षता कमिटीची व्याप्ती वाढवावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांची मगणी

सकाळ डिजिटल टीम

पोलिसांच्या दक्षता कमिटीची व्याप्ती वाढवली पाहिजे. महिला पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्या यांच्या भेटी झाल्या पाहिजेत. तसेच अत्याचारित महिलेला भेटण्यासाठी एक नियमावली तयार करण्यात आली पाहिजे. देशात न्याय देण्यासाठी ज्या यंत्रणा उभारण्यात आलेल्या आहेत त्या यंत्रणांकडून वेळेवर न्याय मिळण्यासाठी नियमावलीची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाच्यावतीने ‘महिलांवरील हिंसाचाराचे निराकरण’ यासंदर्भात एक दिवसीय चर्चासत्राचे आयोजन आज सह्याद्री शासकीय अतिथी गृह येथे करण्यात आले. या कार्यक्रमात उपसभापती डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.

याप्रसंगी, महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग अध्यक्ष, न्यायमूर्ती के के तातेड, न्यायाधीश साधना जाधव, महाराष्ट्र रेल्वे पोलीस महासंचालक डॉ. प्रज्ञा सरवदे, डॉ. मंजू लोढा, डॉ. कविता लालचंदानी आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना राजकीय आरक्षण मिळावे यासाठी महिला आरक्षण विधेयक मंजूर केलेले आहे. यातून महिलांना राजकीय प्रतिनिधित्व करण्याची संधी अधिक प्रमाणात निर्माण झाली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

सर्व जाती धर्मात लिंग समानता असावी. सर्व स्त्रियांना समान न्याय हक्क मिळाले पाहिजेत. स्त्रियांबाबतची मानसिकता बदलण्याची सुरुवात स्वतःपासून करायला पाहिजे. तसेच कुटुंबात देखील लोकशाही असली पाहिजे तरच स्त्री पुरुषांना स्वतंत्रपणे निर्णय घेता येतील. अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

महिला हिंसाचाराचे निर्मूलन करणे हे संयुक्त राष्ट्राचे उद्दिष्ट आहे. महिलांच्या सशक्तीकरणासाठी दर महिन्यातील एक दिवस असणे आवश्यक असल्याची गरज गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting : कोतवालांच्या मानधनात १० टक्के वाढ ते राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती; मंत्रमंडळाच्या बैठकीत झाले 'हे' महत्वाचे निर्णय

Gold Rate: सोने वर्षाच्या अखेरीस 1,00,000 रुपयांच्यावर जाणार; ग्लोबल ब्रोकरेज फर्मने वर्तवला अंदाज

IAS अधिकाऱ्याच्या पत्नीवर गन पॉईंटवर बलात्कार, आरोपींचा जामीन रद्द! कोर्टाने पोलिसांना फटकारले

Purandar Airport: पुरंदर विमानतळासाठी कधी सुरू होणार भूसंपादन? उद्योगमंत्र्यांनी नेमकं काय सांगितले?

Latest Maharashtra News Updates : अमरावती जिल्‍हयामध्‍ये भुकंपाचे सौम्‍य धक्‍के

SCROLL FOR NEXT