One lakh women filled application in Buldhana of ladki bahin yojana esakal
महाराष्ट्र बातम्या

‘लाडकी बहीण’च्या अर्जांची आजपासून छाननी! त्रुटी पूर्ततेसाठी मिळणार एक संधी; अर्ज भरला तेथेच करावी लागेल त्रुटी पूर्तता; ३१ जुलैपर्यंत अर्ज केलेल्यांना पहिल्यांदा लाभ

तात्या लांडगे

सोलापूर : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख २८ हजार महिलांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. या सर्व अर्जांची उद्यापासून (शनिवारी) तालुकास्तरीय समित्यांकडून पडताळणी होणार आहे. या समित्यांनी पात्र केलेली यादी जिल्ह्याच्या समितीकडे पाठविली जाणार आहे.

अडीच लाख रूपयांचे वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलेला या योजनेतून अर्ज करता येणार आहे. राज्य शासनाने या योजनेसंदर्भात वेळोवेळी बदल करून महिलांना सहजपणे अर्ज करता येईल, अशी व्यवस्था केली आहे. योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीणमधून साडेपाच लाख तर शहरातून दोन लाखांपर्यंत अर्ज अपेक्षित आहेत. आतापर्यंत सव्वापाच लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले असून आणखी सव्वादोन लाख अपेक्षित आहेत. आता ३१ जुलैपर्यंत अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणींना १५ ते १९ ऑगस्टपर्यंत लाभ वितरीत केला जाणार आहे. योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ऑगस्टअखेर आहे. १ ते ३१ ऑगस्ट या काळात अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणींना पुढील टप्प्यात लाभ मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

३१ ऑगस्टपर्यंत करता येणार अर्ज

जिल्ह्यातून आतापर्यंत पाच लाख २८ हजारांपर्यंत ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. शनिवारपासून (ता. २७) त्या अर्जांची तालुकास्तरीय समित्यांकडून पडताळणी होणार आहे. त्यांच्याकडील यादी जिल्हास्तरीय समितीकडे येईल आणि त्यानंतर त्यानुसार पात्र महिला अर्जदारांना लाभ मिळेल. ३१ ऑगस्टपर्यंत पात्र महिलांना योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.

- प्रसाद मिरकले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

त्रुटी पूर्ततेसाठी मिळेल एक संधी

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी अर्ज केले आहेत, त्यांच्या अर्जात काही त्रुटी राहिली असल्यास त्याच्या पुर्ततेसाठी त्यांना एक संधी मिळणार आहे. त्यांनी ज्या लॉगिनवरून अर्ज केले आहेत, त्याच लॉगिनवरून त्यांना त्रुटी पूर्तता करता येणार आहे. त्या अर्जांची पुन्हा पडताळणी होऊन तालुकास्तरीय समिती त्याची छाननी करून ते अर्ज पुढे जिल्हास्तरीय समितीकडे येतील. त्याठिकाणी यादी अंतिम होऊन त्या लाडक्या बहिणींना शासनाकडून प्रतिमहा १५०० रूपये मिळतील. योजनेची अंमलबजावणी १ जुलैपासून सुरू झाल्याने लाडक्या बहिणींना एकदम दोन हप्ते वितरीत होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT