ITI Admission  sakal
महाराष्ट्र बातम्या

ITI Admission : ‘आयटीआय’ची दुसरी यादी जाहीर ;राज्यातील ५२ हजार विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची दुसऱ्या फेरीची यादी जाहीर झाली. या फेरीत एकूण ९६ हजार ७०६ जागा उपलब्ध होत्या.

सकाळ वृत्तसेवा

अकोला : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची दुसऱ्या फेरीची यादी जाहीर झाली. या फेरीत एकूण ९६ हजार ७०६ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ५१ हजार ९९ विद्यार्थ्यांना शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये प्रवेश मिळणार आहे.

प्रवेश निश्चित करण्यासाठी यादीतील उमेदवारांना संबंधित संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची यादी जाहीर झाली. या यादीत सरकारी आयटीआयमध्ये ६१ हजार ८९३ जागा उपलब्ध आहेत.

२ ऑगस्टपर्यंत प्रवेश सुरू

उमेदवारांनी सादर केलेल्या पसंतीक्रमातील पहिल्या क्रमांकाच्या संस्थेत त्यांना जागा मिळाली असेल, तर त्यांना प्रवेश निश्चित करणे अनिवार्य आहे. ही जागा उमेदवाराने नाकारली, तर त्याला पुढल्या फेरीत सहभागी होता येणार नाही. २ ऑगस्टपर्यंत दुसऱ्या यादीचे प्रवेश होणार असल्याचे संचालनालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT