भाजप  sakal
महाराष्ट्र बातम्या

भाजपकडून सोलापुरातील ‘या’ विधानसभा मतदारसंघांचा गुप्त सर्व्हे! उमेदवार बदलाची पदाधिकाऱ्यांची मागणी; निवडणुकीपूर्वी नाराजी दूर करण्याचा पक्षश्रेष्ठींचा प्रयत्न

तात्या लांडगे

सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार बदलावा, अशी मागणी भाजपच्याच काही पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याशिवाय उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघातही विद्यमान आमदाराऐवजी उमेदवारीसंदर्भात आमचाही विचार व्हावा, अशी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांचीच मागणी आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने आपल्या गुप्त यंत्रणेच्या माध्यमातून दोन्ही मतदारसंघात सर्व्हे सुरु केल्याचे खात्रिलायक सूत्रांनी ‘सकाळ’ला सांगितले.

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदाराबद्दल प्रचंड नाराजी असल्याने आगामी निवडणुकीत येथील उमेदवार बदलावा, अशी मागणी भाजपचे माजी सभागृहनेता तथा शहर उपाध्यक्ष श्रीनिवास करली यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भुपेंद्र यादव, श्रीकांत भारतीय यांच्याकडे केली आहे. युवा मोर्चाचे सरचिटणीस वैभव हत्तुरे, हत्तरसंगचे सरपंच राजकुमार हालमनी व तेलगावचे सरपंच रमेश निंबर्गी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे यांच्यासह माजी नगरसेवक श्रीनिवास बुरुड, समशेरसिंग अंबेवाले, अशोक पाटील, सचिन चव्हाण, लिंगराज स्वामी, बसवराज पानशेट्टी, श्रीशैल हत्तुरे यांचीही तशी मागणी असल्याचे श्री. करली म्हणाले. आमच्या मागणीसंदर्भात श्री. फडणवीस यांनी नवरात्र झाल्यावर बैठक घेऊन मार्ग काढण्याची ग्वाही दिल्याचेही त्यांनी सांगितले.

दुसरीकडे शहर उत्तर मतदारसंघातून माजी महापौर शोभा बनशेट्टी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय या मतदारसंघातून भाजपकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. दोन्ही मतदारसंघातील उमेदवार सहजासहजी बदलले जाणार नाहीत हे निश्चित आहे. पण, पदाधिकाऱ्यांची नाराजी व त्यांच्या मागणीवर पक्षाकडून कसा तोडगा काढला जातोय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षाकडून सुरु असलेल्या सर्व्हेचा निष्कर्ष काय, याचीही उत्सुकता असून उमेदवारांची यादी जाहीर झाल्यावर ते चित्र स्पष्ट होणार आहे.

अंतर्गत नाराजी दूर होईल

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील महायुतीचे विशेषत: भाजपचे सर्वच उमेदवार विजयी होतील. काही पदाधिकाऱ्यांची विविध कारणांवरून नाराजी असून त्यांची काही दिवसांत समजूत काढली जाईल. पक्षाने जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची प्रत्येकी तीन नावे घेतली असून पक्षातील पदाधिकारी, आजी- माजी नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सदस्यांचे गुप्त मतदानही घेतले आहे. त्यामुळे पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सर्वजण एकीने काम करतील.

- नरेंद्र काळे, शहराध्यक्ष, भाजप

उमेदवारी बदलाची शक्यता कमीच

लोकसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने राज्यात ‘मी पुन्हा येईन’ म्हणत विविध योजना सुरु केल्या आहेत. राज्याची सत्ता पुन्हा आपल्याची हाती यावी यादृष्टीने महायुतीचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार बदलणे भाजपला महागात पडू शकते. त्यामुळे पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करून पुन्हा तेच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील, अशीच सद्य:स्थिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे नेमकं कारण काय? भुजबळ म्हणाले, "मला तर वाटतेय..."

Who Killed Baba Siddique: 2019 मध्ये हत्या, तुरुंगात बिश्नोई गँगशी ओळख अन् मुंबईत गोळीबार... कोण आहे बाबा सिद्दीकींची हत्या करणारा कर्नेल सिंग?

गोफण | आमच्याही पक्षात कलाकार पाहिजे!

On This Day: भारताने २०१९ साली कसोटी क्रिकेटमध्ये केला होता हा विक्रम; ऑस्ट्रेलियाला टाकले होते मागे

Jupiter Red Spot : गुरू ग्रहावरच्या 'रेड स्पॉट'मध्ये दिसली अनोखी हालचाल, शास्त्रज्ञही आश्चर्यचकित,नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT