shahu modak  google
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Din : शाहू मोडक : एका ख्रिश्चन माणसाने २९ वेळा कृष्णाची भूमिका केली आणि गाजवली

१९३६ साली प्रभातच्या सिनेमात शाहूंनी संत तुकाराम साकारले. या भूमिकेला एवढी लोकप्रियता मिळाली की प्रभातने त्यांना १९४० साली संत ज्ञानेश्वर म्हणून प्रेक्षकांसमोर आणले.

नमिता धुरी

मुंबई : आज २५ एप्रिल, म्हणजेच ज्येष्ठ अभिनेते शाहू मोडक यांची जयंती. शाहू मोडक यांनी सिनेविश्वाचा असा काळ गाजवला जेव्हा टीव्हीवरच्या मालिका-सिनेमांमध्ये देवांची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनाच देव समजून बसण्याची मानसिकता प्रेक्षकांमध्ये होती.

शाहू मोडक हे अहमदनगरच्या दलित ख्रिश्चन मराठी कुटुंबात जन्मले होते; मात्र तरीही हिंदू धर्मियांच्या देव्हाऱ्यात त्यांना स्थान मिळालं. वयाच्या १३ वर्षी त्यांनी श्रीकृष्णाची भूमिका पहिल्यांदा साकारली व वयाच्या पन्नाशीतही त्यांना पुन्हा तीच संधी मिळाली. (senior artist shahu modak life story acting career famous personality in maharashtra )

५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी २९ वेळा कृष्णाची भूमिका निभावली. सरस्वती सिनेटोन स्टुडियोच्या भालजी पेंढारकर दिग्दर्शित श्याम सुंदर या सिनेमाातून शाहूंनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. यात त्यांनी आठ गाणी गायली. विष्णू पुराणातल्या श्लोकांचे पठणही केले. संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी साधारण १०० सिनेमे केले. हेही वाचा - संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

१९३६ साली प्रभातच्या सिनेमात शाहूंनी संत तुकाराम साकारले. या भूमिकेला एवढी लोकप्रियता मिळाली की प्रभातने त्यांना १९४० साली संत ज्ञानेश्वर म्हणून प्रेक्षकांसमोर आणले.

इतर धर्माच्या कलावंताने हिंदू देवदेवतांची भूमिका साकारल्यास सनातनी हिंदू नाराज होत. त्यामुळे त्यांचं नामकरण करावं लागे. मोडक हे आडनावावरून ख्रिश्चन वाटत नसत. त्यामुळे लोकांनी त्यांना सहज स्वीकारलं.

संत ज्ञानेश्वरांचा सिनेमा मुंबईत ३६ आठवडे चालला. अमेरिकेतही प्रदर्शित झाला. शाहू हेच खरे ज्ञानेश्वर आहेत अशी भावना प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली. त्यांच्या छायाचित्रांची पूजा लोक करू लागले.

शाहूंनी अशोक फिल्मसच्या १९६५ला आलेल्या हिंदी संत तुकाराम सिनेमात तुकाराम साकारले. त्यानंतर १९५७ला आलेल्या देवेंद्र गोयल यांच्या नरसी भगत सिनेमात नरसीची भूमिका, १९७२ साली संत तुलसीदासमधे तुलसीदासांची भूमिका आणि १९६०च्या भक्तराज सिनेमातही त्यांनी भूमिका साकारली.

रंगलोगतर्फे १९६४ला आलेल्या सिनेमात शाहूंनी ज्ञानेश्वरांच्या वडिलांची भूमिका साकारली. औट घटकेचा राजा या १९३३ला रिलिज झालेल्या सिनेमात त्यांनी दोन गझल गायल्या. त्यानंतर आणखी गाण्यांची ऑफर त्यांना मिळाली.

शाहूंचा १९३९ला आलेला व्ही. शांताराम यांचा माणूस हा सिनेमा समांतर सिनेमांमधला मैलाचा दगड समजला जातो. यात त्यांनी गणपत हवालदार क्रमांक २५५ची भूमिका केली.

११ मे १९९३ रोजी शाहूंचं निधन झालं; मात्र त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT