Dilip Walse Patil sakal
महाराष्ट्र बातम्या

Sugar Factory : राज्यातील साखर कारखान्यांचे साडेसात हजार कोटी माफ; दिलीप वळसे पाटील यांची माहिती

‘भीमाशंकर सहकरी साखर कारखान्याने ‘एफआरपी’पेक्षा अधिक ५०० रुपये प्रती टन बाजारभाव दिल्यामुळे प्राप्तिकर खात्याने ११० कोटी रुपये रक्कम भरण्याची नोटीस दिली होती.

सकाळ वृत्तसेवा

मंचर (जि. पुणे) - ‘भीमाशंकर सहकरी साखर कारखान्याने ‘एफआरपी’पेक्षा अधिक ५०० रुपये प्रती टन बाजारभाव दिल्यामुळे प्राप्तिकर खात्याने ११० कोटी रुपये रक्कम भरण्याची नोटीस दिली होती. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्याकडे राज्य सरकारने विनंती व पाठपुरावा केल्यामुळे ‘भीमाशंकर’सह देशातील सर्व साखर कारखान्यांची २००३ ते २०२२ पर्यंतचे दहा हजार कोटी रुपयांची रक्कम प्राप्तिकर खात्याने माफ केली आहे.

यामध्ये महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची ७ हजार ५०० कोटी रुपये माफ केले आहेत.’’ अशी माहिती सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

मंचर (ता.आंबेगाव) येथे रविवारी शरद बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वळसे पाटील बोलत होते. यावेळी आमदार अतुल बेनके, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, शरद बँकेचे व्यवस्थापकीय संचालक राजेश देशमुख, पूर्वा वळसे पाटील आदी उपस्थित होते.

वळसे पाटील म्हणाले, ‘गावपातळीवरील विविध सहकारी सोसायट्यांना सक्षम करण्याचे धोरण आहे. या सोसायट्या लहान-मोठे १५० हूण अधिक व्यवसाय सुरू करू शकतील. पण, त्यासाठी संचालक मंडळ व सचिव सक्षम असणे गरजेचे आहे. सोसायट्यांना सचिव नेमण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे संस्था चालक व सचिवांनी अभ्यासपूर्वक कामकाज करणे आवश्यक आहे.

शरद बँक, पतसंस्था व भीमाशंकर कारखान्याच्या कामकाजाला कुठेही गालबोट लागले तर संस्थेची बदनामी होईल, याचे भान ठेवावे. बॅंका किंवा पतसंस्थेत चुकीचे कामकाज चालत असेल तर मला आवर्जून भेटून सांगा. कारण, बँका व तालुक्यातील सर्व पतसंस्था व सोसायट्या आपल्या आहेत. त्या काचेच्या भांड्यासारख्या असून, सभासदांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी.'

महाराष्ट्राचा सहकारात मोठा वाटा आहे. या पार्श्वभूमीवर पुणे दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्यासमवेत प्राथमिक चर्चा झाली आहे. केंद्राचे सहकार विभागाचे धोरण ठरवत असताना चर्चेसाठी नवी दिल्लीत बोलवतो, असे मला आवर्जून सांगितले आहे. राज्यातील सहकारी संस्थांचे हित लक्षात ठेवूनच दिशादर्शक धोरण ठरवण्यास प्राधान्य राहील.

- दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल; शिवसेनेच्या (UBT) नेत्याचा दावा

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT