medical admission esakal
महाराष्ट्र बातम्या

Medical Admission : साडेसतरा हजार जागांसाठी 51 हजार विद्यार्थ्यांचे अर्ज; प्रवेशासाठी वाढणार चुरस

अरुण मलाणी

Medical Admission : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी नोंदणीची मुदत संपली आहे.

राज्‍यस्‍तरावर पदवीच्‍या विविध अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्षाच्‍या सुमारे साडेसतरा हजार जागा उपलब्‍ध असताना प्रवेशासाठी नोंदणी केलेल्‍या विद्यार्थ्यांची संख्या ५१ हजारांहून अधिक आहे. त्‍यामुळे प्रवेश मिळविण्यासाठी चुरस वाढणार आहे. (seventeen and half thousand seats Applications of 51 thousand students for medical admission news)

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी ‘नीट’ परीक्षेच्‍या आधारे प्रवेश दिले जात असून, राज्‍यस्‍तरावरील ८५ टक्‍के जागांवर प्रवेशाची प्रक्रिया ‘सीईटी सेल’मार्फत राबविली जात आहे. याअंतर्गत प्रवेशप्रक्रियेत सहभागी होण्यासाठी आवश्‍यक नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

या प्रक्रियेत ५५ हजार १८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असली तरी प्रत्‍यक्षात ५१ हजार १०६ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शुल्‍क अदा करून प्रक्रिया पूर्ण केली आहे.

त्‍यामुळे केवळ हेच विद्यार्थी प्रवेशाच्‍या पुढील प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पात्र आहेत. दरम्‍यान, प्रवेशप्रक्रियेत सहभागी झालेल्‍या विद्यार्थ्यांची संख्या पन्नास हजारांहून अधिक असली तरी प्रत्‍यक्षात विविध पदवी अभ्यासक्रम मिळून एकूण १७ हजार ४०३ जागा उपलब्‍ध असणार आहेत. उपलब्‍ध जागांच्‍या तुलनेत जवळपास तिप्पट अर्ज दाखल झालेले असल्‍याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चुरस बघायला मिळणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एमबीबीएस, बीडीएसची उद्या निवड यादी

बुधवारी (ता. २) तात्‍पुरती गुणवत्तायादी जाहीर केली आहे. एमबीबीएस आणि बीडीएस या अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालय पसंतीचा प्राधान्‍यक्रम नोंदविण्यासाठी गुरुवार (ता.३)पर्यंत मुदत आहे. शुक्रवारी (ता. ४) पहिली निवडयादी प्रसिद्ध होणार आहे. या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ५ ते ९ ऑगस्‍ट यादरम्‍यान मुदत दिली जाणार आहे.

अभ्यासक्रमनिहाय प्रवेश क्षमता अशी (कंसात महाविद्यालयांची संख्या)

* एमबीबीएस

० शासकीय/मनपा- चार हजार ९३० (३१),

० खासगी वैद्यकीय महाविद्यालये- तीन हजार ०७० (२३).

* बीडीएस

० शासकीय/मनपा- ३२६ (४),

० खासगी दंत महाविद्यालये- दोन हजार ४०० (२६).

* आयुर्वेद (बीएएमएस)-

० शासकीय/अनुदानित- एक हजार ७१२ (२१),

० खासगी आयुर्वेद महाविद्यालये- चार हजार ०५० (६१)

* होमिओपॅथी (बीएचएमएस)-

० खासगी होमिओपॅथी महाविद्यालये- चार हजार ४१५ (५६)

* युनानी (बीयूएमएस)-

० शासकीय युनानी महाविद्यालय- १८० (३)

० खासगी युनानी महाविद्यालय- २३० (४)

* फिजिओथेरपी-

० शासकीय महाविद्यालय- ९० (४)

० खासगी महाविद्यालय- तीन हजार ९६० (७८)

* ॲक्युपेशनल थेरपी- ९० (४)

* अन्‍य अभ्यासक्रम- ४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kashinath Date: पारनेरमध्ये लंकेंच्या गडाला सुरुंग लावणारे काशिनाथ दाते कोण? काय होती रणनीती?

Latest Marathi News Updates : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल

Weight Gain Problem : मुलांपासून प्रौढांमध्ये लठ्ठपणामुळे वाढती समस्या, आरोग्यावरील गंभीर परिणाम आणि उपाय...जाणून घ्या

Ahilyanagar Crime : पाळीव 'पोपट' मारला; तिघांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, तीन महिन्याच्या शिक्षेसह 500 रूपये दंड

Maharashtra CM : महाराष्ट्रात बिहार पॅटर्न का लागू होऊ शकत नाही? ही आहेत ५ मोठी कारणे

SCROLL FOR NEXT