Water Scarcity sakal
महाराष्ट्र बातम्या

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

राज्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असून टँकरने पाणीपुरवठा वाढला असला तरी अनेक वाड्या आणि गावांत पिण्याच्या पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत आहे. सध्या राज्यातील ७,४९५ गावे आणि वाड्यांमध्ये २,७३७ टँकरमधून पाणीपुरवठा केला जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असून टँकरने पाणीपुरवठा वाढला असला तरी अनेक वाड्या आणि गावांत पिण्याच्या पाण्यावाचून नागरिकांचे हाल होत आहे. सध्या राज्यातील ७,४९५ गावे आणि वाड्यांमध्ये २,७३७ टँकरमधून पाणीपुरवठा केला जात आहे.

सध्या राज्यातील मोठ्या धरणांमध्ये केवळ २८.४२ टक्के पाणीसाठा आहे, तर मध्यम प्रकल्पांत ३७.४४ आणि लघू पाटबंधारे प्रकल्पांत २९.९६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या दहा दिवसांत झपाट्याने पाणीपातळीत घट होत असून अद्याप मॉन्सूनच्या पावसाला उशीर असल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे. २० एप्रिल रोजी राज्यातील धरणांमध्ये ३१ टक्के पाणीसाठा होता, तो झपाट्याने कमी होत असून नऊ दिवसांत तो २८ टक्क्यांवर आला आहे. अनेक प्रकल्पांतील पाणी वापरावर निर्बंध घालण्यात आले असून नदीकाठावरील वीज कनेक्शन बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे पिके करपत असून जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न उभा राहिला आहे.

केंद्र सरकारने पिण्याच्या पाण्यासाठी पुढील तीस वर्षांचा आराखडा तयार करून राबविलेली ‘जलजीवन मिशन’ ही योजना पाण्याअभावी कोरडी पडल्याचे चित्र गावोगावी आहे. ‘हर घर नल से जल’ असा गाजावाजा करत ही योजना राबविली गेली खरी पण योजनेच्या मार्गदर्शक सूचनांना स्थानिक पातळीवर कात्रजचा घाट दाखवीत ड्राय झोनमध्ये अनेक ठिकाणी जॅकवेल बांधली गेली आहेत. वापरण्यायोग्य नऊ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने छत्रपती संभाजीनगरात अभूतपूर्व पाणीटंचाई आहे.

आठ ते नऊ दिवसांनी येथे पाणीपुरवठा होत असून सध्या येथे ५३९ टॅँकरनी पाणीपुरवठा केला जात आहे. एक एप्रिल रोजी राज्यात १,५२२ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता, तो आकडा २९ एप्रिल रोजी २,७३७ टँकरवर गेला आहे. तर गावांची संख्या १,२३३ वरून २,१८४ वर तर वाड्यांची संख्या दुप्पट झाली असून २,७७५ वरून ५,३११ वर गेली आहे. जायकवाडी धरणातील पाणीसाठा गेल्या नऊ दिवसांत १२.९४ वरून ९.२९ वर आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT