Samruddhi Accident Esakal
महाराष्ट्र बातम्या

Samruddhi Accident: शहापूर दुर्घटनेत 20 मृत कामगारांची नावे आली समोर; दुर्घटनेबाबत CM शिंदेंनी दिल्या महत्वाच्या सूचना

समृध्दी महामार्गावर पुलावर गर्डर टाकताना क्रेन कोसळून भीषण अपघात झाला

अंकिता खाणे (Ankita Khane)

शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर पुलावर गर्डर टाकत असताना सोमवारी (३१ जुलै) रात्री क्रेन कोसळून भीषण अपघात झाला होता. या भीषण दुर्घटनेमध्ये 20 कामगारांचा मृत्यू झाला आहे. अजूनही काही कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील कार्यक्रम आटोपल्यानंतर मंगळवारी सायंकाळी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत घटनेची संपुर्ण माहिती घेतली आहे.

भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडु नयेत, यासंबधी काळजी घेण्याबाबत सूचना एमएसआरडीसीला देण्यात आल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, झालेली घटना अतिशय दुर्देवी आणि दु:खद आहे. या ठिकाणी जवळपास 700 टनाचा लाँचर आणि 1 हजार 250 टनाचा गर्डर आहे.

तांत्रिक काम सुरू असतानाच लाँचर आणि गर्डर कोसळ्याने ही घटना घडली आहे. या ठिकाणी 28 जण काम करीत होते. यामध्ये काम करणारे अभियंते व मजूर असे मिळून 20 जणांचा मृत्यू झाला आहे तर 3 जण जखमी आहेत. 5 जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेची गांभिर्याने दखल घेतली आहे. त्यांनी देखील मृत व्यक्तीकरिता संवेदना व शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या परिवाराला केंद्र शासनाकडून 2 लाख रुपयांची आणि राज्य शासनाच्या वतीने 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीने देखील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे, असं शिंदे म्हणाले.

समृद्धी महामार्गावरील या दुर्घटनेतील मृतांची नावे आली समोर

१) संतोष जे एतंगोवान (सिनियर ग्रँटी मॅनेजर,वय 35 रा. 2/225, व्हीआयपी नगर, लक्ष्मी निवास, बोगनपल्ली, टाटा शोरुमच्या मागे, कृष्णागिरी, तामिळनाडू.

२) कानन व्ही वेदारथिनम (पीटी इंजिनिअर, वय 40, 3/138, पप्पू रेत्तीकुथागाई, वेधारण्यम टीके, अयक्करांबलम, अयक्करांबूलम, नागपट्टम, तामिळनाडू-६१४७०७)

३) प्रदिप कुमार रॉय, (हायड्रॉलिक टेक्निशियन, वय 45, रा. मणिबाला रॉय, दक्षिण खट्टीमारी, जलपाईगुडी, पश्चिम बंगाल-735210)

४) परमेश्वर खेदारूलाल यादव (विंच ऑपरेटर, वय 25, रा. वॉर्ड क्रमांक-15, सुभाष नगर, मलाहिया, सैदपूर, गाझीपूर, उत्तरप्रदेश-233304),

५) राजेश भालचंद्र शर्मा (हायड्रॉलिक ऑपरेटर, वय 32, रा. नौगावा थागो, उधम सिंग नगर, उत्तराखंड-262308)

६) बाळाराम हरिनाथ सरकार (सुपरवायझर, धौलागुरी, चारेर बारी, जलपाईगुडी, पश्चिम बंगाल-735224)

७) अरविंद कुमार उपाध्याय (सुपरवायझर, वय 33, रा. 1048, बलुआ, नागरा, बलिया, उत्तरप्रदेश -221711)

८) नितीनसिंह विनोद सिंह (वय 25, रा. रसरा, बलिया, उत्तर प्रदेश -221712)

९) आनंद कुमार चंद्रमा यादव, (वय 25, रा. गौरा मदनपुरा, एकेल, बलिया, उत्तर प्रदेश -221711)

१०) लल्लन भुलेट राजभर (वय 38, रा. देहारी, कटवारी, बलिया, रसरा, उत्तरप्रदेश -२२१७१२)

११) राधे श्याम भीम यादव (वय 40, रा. गौरा मदनपुरा, नागरा, बलिया, उत्तर प्रदेश -221711)

१२) सुरेंद्र कुमार हुलक पासवान (वय 35, रा. विल-माली अरवल, बिहार-804419)

१३) पप्पू कुमार कृष्णदेव साव (वय 30, रा. विल-माली, ठाणे-बंशी, अरवल, बिहार-804419)

१४) गणेश रॉय (वय 40, रा. पश्चिम डौकीमारी, गरियालतारी, जलपाईगुडी, पश्चिम बंगाल-735233)

१५) सुब्रोतो धिरेन सरकार (वय 23, रा. धौलागुरी, चारेर बारी, जलपाईगुडी, पश्चिम बंगाल-735224)

१६) लवकुश कुमार राम उदित साव (वय 28, रा. ग्राम एन पोस्ट-माली, अरवल, बिहार-804419)

१७) मनोज सिंह इंद्रदेव यादव (वय 49, रा. नंदन, बक्सर, डुमराव, बिहार-८०२११९)

१८) राम शंकर यादव (वय 43, उत्तरप्रदेश), सत्य प्रकाश पांडे (वय 30, बिहार), सरोजकुमार (वय 18, उत्तर प्रदेश

जखमींवर उपचार सुरू, प्रकृती स्थिर

प्रेम प्रकाश अयोध्य साव (वय 37) यांच्या पायाला दुखापत झाली आहे. शहापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर किशोर हिव (वय 40) व चंद्रकांत वर्मा (वय 36) या दोघांवर जखमींना ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली

Latest Maharashtra News Updates : प्रियांका गांधी यांची आज 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा; कोल्हापुरातील गांधी मैदानात आयोजन

मतदानाला जाताना मोबाईल घेवून जावू नका! मतदान करतानाचा व्हिडिओ केल्यास दाखल होणार गुन्हा; ‘ईव्हीएम’वर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राध्यक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना

शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी! समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद; उजनी धरणातील पाणीवाप कसे? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT