rohit pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar : शाहू महाराज पवारांच्या व्यासपीठावर येण्यामागे 'हे' आहे कारण...; रोहित पवारांनी दिलं स्पष्टीकरण

संतोष कानडे

कोल्हापूरः कोल्हापूरमध्ये शरद पवारांची सभा होत आहे. त्यापूर्वी रोहित पवारांनी पत्रकार परिषदेद्वारे अजित पवार गटावर टीकास्र सोडत सभेविषयी माहिती दिली. रोहित पवारांनी हसन मुश्रीफांवर तोंडसुख घेतलं. महत्त्वाचं म्हणजे शाहू महाराज उद्या शरद पवारांच्या सभेमध्ये व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत, त्याबद्दलही रोहित पवारांनी स्पष्टीकरण दिलं.

मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबद्दल बोलतांना रोहित पवार म्हणाले की, एमआयडीसीमध्ये हसन मुश्रीफ यांचे पदाधिकारी आणि नातेवाईक अडचणी निर्माण करत आहेत. तशा तक्रारी आमच्याकडे आधीदेखील आल्या होत्या, आताही येत आहेत. पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे, अशा वातावरणात नवीन कंपन्या आपल्या जिल्ह्यात येत नाहीत त्यामुळे तरुणांच्या नोकरीचा प्रश्न सुटत नाहीये. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जी श्वेतपत्रिका काढली त्यापेक्षा कोरा पेपर दाखवला असता तर बरं झालं असतं, असा घणाघात रोहित पवारांनी केला.

संभाजीराजे छत्रपती यांचे वडील शाहू महाराजांबद्दल बोलताना रोहित पवार म्हणाले की, शाहू महाराज व्यासपीठावर येणार आहेत, ते समतेचा विचार देण्यासाठी. कोणत्याही राजकारणासाठी शाहू महाराजांना व्यासपीठावर आणलं जात नाहीये. दसरा चौक हा ऐतिहासिक चौक आहे, तिथुन पुरोगामी विचार महाराष्ट्राला द्यायचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की, शरद पवार यांची स्वाभिमान सभा उद्या दसरा चौकात होणार आहे. कोल्हापूर आणि साहेबांचं वेगळं प्रेम आहे, रक्ताचं नातं आहे. दसरा चौकात सभा घेण्याचं खास कारण आहे.. आम्ही सर्वजण पुरोगामी विचाराने काम करतो. तो विचार या पवित्र आणि विचाराने पावन झालेलं ठिकाणाहून देण्याचा प्रयत्न आहे. सभेला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्व नागरिक स्वतःच्या गाडीने, स्वखर्चाने या सभेला उपस्थित राहणार असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं.

काय म्हणाले रोहित पवार?

- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेसाठीची पहिली बैठक कोल्हापुरात झाली होती

- लोकांच्या मनात पवार साहेब आहेत

- भाजपच्याविरोधात लढायचे आहे, त्यामुळं कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले आहेत

- शिवसेना फोडली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला याचा अर्थ भाजपचा आपल्या कार्यकर्त्यांवर विश्वास राहिला नाही

- आतापर्यंतच्या राजकारणात पवार साहेब भाजपच्या बाजूला कधी गेले नाही

- इतकंच नाही तर पवार साहेब कधीही दिल्लीसमोर झुकले नाही

- सांगलीमधील लोकल नेत्यांनी काही बोललं असेल त्यात काही तथ्य नाही

- पवार कुटुंबात पवार येतातच पण राष्ट्रवादी काँग्रेस हा पवार साहेब यांचं कुटुंब आहे

- इस्रो ही राजकीय संस्था आहे

- अनेक पंतप्रधानांनी त्या संस्थेला ताकद दिली आहे

- चांद्रयान यशस्वी करण्यात शास्त्रज्ञांचं योगदान आहे

- मात्र भाजप म्हणत आहे हे सर्व मोदींमुळे झाले म्हणतात

- याचं भाजप राजकारण करत आहे

- किमान शास्त्रज्ञांचं नाव तरी घ्या

- या यशस्वी मोहिमेचं सर्व श्रेय शास्त्रज्ञांना जातं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: उड्डाणादरम्यान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, ऐन प्रचारादरम्यान विमानतळावरच अडकून पडले!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT