महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेचे धडाकेबाज 'शंभूराज' आता राज्यमंत्री

सातारा

सातारा ः शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई यांना पाटण विधानसभा मतदार संघाचे तिसऱ्यांदा प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. सन 2004 मध्ये शिवसेनेतून निवडणूक लढवून ते पहिल्यांदा निवडून आले होते. याच काळात आमदार देसाई यांना उत्कृष्ट संसदपट्टू म्हणून गौरवण्यात आले.

सन 2009 मध्ये त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विक्रमसिंह पाटणकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर देसाई यांनी पून्हा सन 2014 व सन 2019 मधील निवडणूकांमध्ये शिवसेनेच्या चिन्हावर निवडून येण्याची किमया साधली.
नक्की वाचा -  उदयनराजेंना चीतपट करणारे बाऴासाहेब झाले मंत्री

गेल्या वेळी विधानसभा तालीका अध्यक्षपदावर पाचवेळा देसाई यांनी काम केले आहे. वडील शिवाजीराव देसाई यांच्या निधनानंतर वयाच्या 21 व्या वर्षी शंभूराज देसाई यांच्यावर लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा आली.

राष्ट्रवादीच्या सत्यजीतसिंहांनी मैदान साेडताना सेनेच्या शंभूराजांचे केले अभिनंदन

त्यामुळे तेव्हापासून ते समाज व राजकारणात सक्रीय झाले. सन 1995 ते 1999 मध्ये राज्यात शिवसेना- भाजप युती शासनाच्या काळात शंभूराज देसाई यांना सहकार परिषेदेचे अध्यक्षपदी काही काळ काम करण्याची संधी मिळाली. त्याशिवाय महाराष्ट्र बॅंकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. सन 2014 ते 2019 या कालावधीमधील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सरकारच्या काळात आमदार देसाई यांना मंत्रीपदाची संधी मिळू शकली नव्हती.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दीपक केसरकर म्हणजे 'ऑल राउंडर सचिन तेंडुलकर', माझ्यासाठी ते 'फायटर' आहेत; असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Nagpur Crime : एमडी द्यायला आला अन्‌ पोलिसांच्या तावडीत अडकला, ५४ ग्रॅम एमडीसह पिस्तूल जप्त

Ranji Trophy 2024-25: मुंबईसाठी करो वा मरो परिस्थिती, महाराष्ट्राचे पॅकअप; पहिल्या टप्प्यानंतर असे आहेत पाँइंट्स टेबल

Healthy Tea : सिताफळ बासुंदी खाल्ली असेल, सिताफळाचा चहा प्यायलात का? होतील अनेक फायदे

Sushma Andhare : आता काय नारायण राणेंना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करायचे का? सुषमा अंधारेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT