Sushma Andhare Defamation Case:ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावर बोलताना शिवसेना (उबाठा) पक्षाच्या सुषमा अंधारे यांनी शंभूराजे देसाई यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर अंधारेंनी केलेले सर्व आरोप शंभूराजे देसाई यांनी फेटाळून लावले होते.
त्यानंतर आता पाटणमध्ये सुषमा अंधारेंविरोधात अब्रुनुकसानीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. शंभूराजे देसाई यांच्या कार्यकर्त्यांनी ही तक्रार दाखल केली. यावेळी या कार्यकर्त्यांनी शंभूराजे देसाई यांची प्रतिमा अंधारेंनी मलीन केली, असा आरोपही लावला.
मागच्या काही दिवसांपासून ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापलं होतं. या ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटीलने पोलिसांच्या हातावर तुरु देत पळ काढल्यानंतर सुषमा अंधारेंनी महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांवर आरोप लावला होता.
यामध्ये दादा भुसे आणि शंभूराजे देसाई यांच्या नावाचा उल्लेख अंधारेंकडून करण्यात आला होता. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या मंत्र्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती.(Latest Marathi News)
ललित पाटील याला पळून जाण्यात राजकीय नेत्यांनी मदत केली आहे. ललित पाटील याच्यासोबक मंत्री दादा भुसे आणि देसाई यांचीही नार्को टेस्ट करा, त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी अंधारे यांनी केली होती. त्याचबरोबर अंधारे यांनी ससून रुग्णालयाच्या डीनचीही नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती.
त्यांच्या या मागणीवर मंत्री दादा भुसे आणि शंभूराजे देसाई यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर आता देसाई यांच्या कार्यकर्त्यांनी अंधारेंविरोधात अब्रुनुकसानीची तक्रार दाखल केली. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.