Sharad pawar
Sharad Pawar ESakal
महाराष्ट्र

Sharad Pawar: शरद पवारांनी कोल्हापूरात टाकला मोठा राजकीय डाव? अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा मोठा नेता भेटीला

आशुतोष मसगौंडे

माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार सध्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या विविध कार्यक्रमांबरोबर अर्थसंकल्पावरही प्रतिक्रिया देत हा अर्थसंकल्प विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन माडला असल्याचे म्हटले आहे.

या सर्व घडामोडींमध्ये पवार यांनी कोल्हापूरात मोठा राजकीय डाव टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ए.वाय पाटील यांनी पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार अजित पवार यांना धक्का देणार का? असा प्रश्न राज्यातील नागरिकांना पडला आहे.

कोण आहेत ए.वाय पाटील?

ए.वा पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. त्यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार शाहू महाराज यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे येत्या काही काळात ते अजित पवार यांची साथ सोडणार हे निश्चित होते.

दरम्यान ए.वाय पाटील हे विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी उत्सुक होते. पण त्यांची काँग्रेसशी जवळीक वाढल्यानंतर काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे जर काँग्रेसशी नाही जमले तर ए.वाय पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाऊ शकतात.

दरम्यान राज्यात येत्या तीन महिन्यांत विधानसभेची निवडणूक लागणार आहे. त्यामुळे सर्वच आजी-माजी आमदार आणि इच्छुकांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

गेल्या जुलैमध्ये राष्ट्रवादी फुटल्यानंतर ए.वाय पाटील अजित पवार यांच्यासोबत गेले होते. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्षपदही मिळाले होते. पण आता ते पुन्हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. त्यामुळे आता शरद पवार त्यांना पुन्हा पक्षात घेणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Speech: 'प्रपोगंडा ते संविधान...' पंतप्रधानांच्या राज्यसभेतील भाषणातील 5 महत्त्वाचे मुद्दे

James Anderson: शेवटच्या सामन्यापूर्वी अँडरसनचा कहर; 41 व्या वर्षीय एकाच डावात घेतल्या 7 विकेट्स, पाहा Video

Ajit Pawar : नवाब मलिकांच्या बाबतीत अजित पवार ठाम? प्रश्न विचारताच म्हणाले, तुम्हाला काय त्रास...

Hathras Stampede: हाथरस दुर्घटनेतील बाबाच्या खोलीत फक्त मुलींनाच प्रवेश दिला जायचा? नारायण साकारबद्दल अनेक धक्कादायक खुलासे

Tata Group: टाटा अमरावतीमध्ये उभारणार दक्षिण आशियातील सर्वात मोठं ट्रेनिंग सेंटर; हजारो तरुणांना मिळणार रोजगार

SCROLL FOR NEXT