Chhgan Bhujbal  esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : वायबी सेंटरमध्ये जाताच भुजबळ म्हणाले, विठ्ठला सांभाळून घे आम्हाला! पवारांनी मात्र...

संतोष कानडे

मुंबईः राज्याचं राजकारण पुन्हा एकदा मोठ्या धक्क्याच्या उंबरठ्यावर असल्याचं दिसून येतंय. त्याचं कारण फुटीर गटाने घेतलेली शरद पवारांची भेट. या भेटीमध्ये अजित पवार गटाने एकत्र येऊन काम करण्याची विनंती केली मात्र पवारांनी मौन बाळगलं.

आज दुपारच्या दरम्यान अचानक अजित पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनिल तटकरे आणि इतर नेत्यांनी वायबी सेंटरवर जात शरद पवारांची भेट घेतली. अजित पवार आणि त्यांचा गट शरद पवार यांना भेटल्यावर आतमध्ये काही घडामोडी घडल्या.

मध्ये जाताच मंत्री संजय बनसोडे, नरहरी झिरवाळ यांनी शरद पवार यांचे पाय धरले आणि नतमस्तक झाले. छगन भुजबळ आत जाताच 'विठ्ठला सांभाळून घे आम्हाला' असा धावा केला. फुटीनंतर आमचा वाद विठ्ठलाशी नसून बडव्यांशी आहे, असं अजित पवार गटाचे नेते म्हणाले होते. त्यानंतर आज पुन्हा शरद पवारांचा विठ्ठल म्हणून उल्लेख झाला. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अजित पवार गटाकडून शरद पवार यांना सोबत येण्याची विनंती केली गेली. अजित पवार यांना शरद पवार यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे शरद पवार काय निर्णय घेतात, याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

बैठकीनंतर बोलतांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, प्राथमिकता अशी आहे की, सगळे माघारी आले तर मला पक्षाचा अध्यक्ष म्हणून आनंदच वाटेल. आम्ही सरकारमध्ये नाहीत. आमचे काही लोक तिकडे गेले आहेत, त्यांनी सरकारला समर्थन दिलेलं आहे. मात्र आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. शिवसेना आणि काँग्रेससोबत सध्या आम्ही पुढे जात आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT