Sharad Pawar announces Supriya Sule Praful Patel new NCP working presidents Ajit Pawar reaction  
महाराष्ट्र बातम्या

Supriya Sule : सुप्रिया सुळेच वारसदार! अजित पवारांनी खाली पाहूनच वाजवल्या टाळ्या

रोहित कणसे

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या २५व्य वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मोठी घोषणा केली आहे. पवारांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा केली आहे. आज, १० जून रोजी पक्षाच्या कार्यक्रमानिमीत्त सर्व राष्ट्रवादीचे प्रमुख नेते दिल्लीत होते. या कर्यक्रमातील संबोधनादरम्यान शरद पवारांनी ही नावे जाहीर केली.

दरम्यान या घोषणेनंतर शरद पवार यांचा वारसदार कोण? या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याचं बोललं जात आहे. कार्याध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे जाहीर झाल्याने शरद पवारांचा राजकीय वारसा सुप्रिया सुळेच चालवणार हे निश्चित मानलं जात आहे.

अन् शरद पवारांनी भाकरी फिरवली..

काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी युवक काँग्रेसच्या कार्यक्रमात भाकरी फिरवावी लागते अन्यथा ती करपते असे विधान केले होते. त्यानंतर पक्षात मोठ्या बदलाचे संकेत मिळाले होते. यानंतर लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी अचानक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावरून गोंधळ सुरू केल्यानंतर शरद पवारांनी त्यांच्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतला.

अजित पवारांनी बोलणं टाळलं...

आजच्या या कार्यक्रमाला सुप्रिया सुळे या अनुपस्थित राहिल्याचे दिसून आले, मात्र अजित पवारांनी मात्र या कर्यक्रमाला हजेरी लावली होती. शरद पवार कार्याध्यक्षपदाची घोषणा करत असताना अजित पवार हे टेबलावर ठेवलेली पाण्याच्या बाटली हातात खेळवताना दिसले. तसेच जेव्हा घोषणा झाली तेव्हा त्यांनी घाली पाहत टाळ्या वाजवल्याचे देखील दिसून आलं. इतकेच नाही तर कार्यक्रम संपताच माध्यमप्रतिनिधींनी त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

कोणाकडे काय जबाबदारी?

राज्यातील निवडणूकांची जबाबदारी ही सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच देशभरातील आगामी निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी देखील हे नवनिर्वाचित कार्यकारी अध्याक्ष सांभाळणार आहेत. यादरम्यान अजित पवार यांच्याकडे सध्यातरी कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही.

आता सुप्रिया सुळे या महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी सांभाळतील. तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे गुजरात, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान आणि गोवा या राज्यांची जबाबदारी सांभाळणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT