राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली आहे. राहुल गांधींबरोबरच्या बैठकीनंतर शरद पवारांनी मोठं विधान केलं आहे. विरोधकांना एकत्र आणण्याची सुरुवात झाली आहे, असं विधान केलं आहे. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात पुन्हा राजकीय भूकंप घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (sharad pawar big statement After Meeting With Rahul Gandhi And Mallikarjun Kharge maharashtra politics )
भाजपविरोधी राजकीय पक्षांना एकत्र आणण्याबाबत रणनीती आखण्यासाठी ही बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला.
काय म्हणाले शरद पवार?
भाजपाविरोधात विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा जो विचार मल्लिकार्जुन खरगे यांनी मांडला, तोच विचार आमचा आहे. पण केवळ विचार करून उपयोग नाही, त्यावर पूर्ण क्षमतेनं काम करण्याची गरज आहे. काही राजकीय पक्ष असे आहेत, ज्यांची विचारधारा आमच्याबरोबर काम करण्याची आहे.
त्यांना बरोबर घेऊन काम करण्यासाठी जे प्रयत्न करायचे आहेत, त्यावर विरोधी पक्षनेता म्हणून मल्लिकार्जुन खरगे यांनी लक्ष केंद्रीत केलं तर मार्ग आणखी सोपा होईल.
ही सुरुवात झाली आहे. यानंतर बाकीचे जे महत्त्वाचे विरोधी पक्ष आहेत, जसं की.. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल किंवा इतर विरोधी पक्ष ज्यांच्याशी अद्याप चर्चा झाली नाही, अशा नेत्यांना भेटून त्यांना या प्रक्रियेत आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. असही शरद पवार म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.