st strike google
महाराष्ट्र बातम्या

शरद पवारांच्या घरावर हल्ल्याप्रकरणी १०७ जणांवर गुन्हा दाखल

याप्रकरणाची वरिष्ठ पोलिस अधिकारी करणार चौकशी आहेत.

सकाळ डिजिटल टीम

याप्रकरणाची वरिष्ठ पोलिस अधिकारी करणार चौकशी आहेत.

आज दुपारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवास स्थानावर एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं. यावेळी मोठ्या प्रमाणात कर्मचारी शरद पवार यांच्या बंगल्यावर दाखल झाले. या कर्मचाऱ्यांकडून बंगल्यावर चप्पल आणि दगडफेक करण्यात आली आहे. अचानक एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून कोर्टाचा निर्णय मान्य नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे. या हल्ल्याप्रकरणी 107 जणांवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात 23 महिलांचाही सहभाग असल्याच समोर आलं आहे. दंगल परिस्थिती निर्माण करणे आणि षडयंत्र रचणे अशी विविध कलम लावून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (FIR on 107 st employees)

आज दुपारी अचानक राष्ट्र्रवादी नेते शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला आहे. याप्रकरणी 107 जणांसह 23 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गावदेवी पोलिस ठाण्यात या १०७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतील वरिष्ठ पोलिस अधिकारी या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. दरम्यान, 107 जणांना अटक होणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई हायकोर्टानं (Mumbai High Court) एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याचा अल्टिमेटम दिलाय. तसंच कर्मचाऱ्यांच्या वेतनासंबंधीच्या मागण्याबाबत राज्य शासनाला आदेश दिलेत. या आदेशाचं आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. दरम्यान, जोपर्यंत हायकोर्टाच्या निर्णयाची प्रत मिळत नाही, तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत कोणत्या तारखेला, किती वाजता एकाच वेळी निर्णय घेऊ, अशी भूमिका या उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी माध्यमांशी बोलताना मांडली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT