महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून राजकारण चांगलंच पेटलं आहे. भाजपने धनंजय महाडिकांना मैदानात उतरवल्यानंतर चुरस वाढली. दिवसभरात सर्व पक्षांनी मतदानाची प्रक्रिया पार पाडली. मात्र, मंत्री जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांनी त्यांची मतं अन्य सदस्यांना दाखवल्याचा आरोप भाजपने केला. यानंतर परिस्थितीत बदलली. (Rajyasabha Election 2022 Latest News)
भाजपने मुख्य निवडणूक सचिवांना पत्र लिहून याची माहिती दिली. ही मतं अवैध ठरवण्याची मागणी होत आहे. आता मविआ सरकारच्या बाजूने देखील जयंत पवार, अनिल देसाई आणि बाळासाहेब थोरात यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. अद्याप मतमोजणीबद्दल संभ्रम असताना शरद पवार यांनी एका रात्रीतून फिरवलेल्या सूत्रामुळे महाविकास आघाडीला फायदा होणार आहे. (Sharad Pawar Changed Voting quota for Rajyasabha Election 2022)
शरद पवार यांनी रात्रीतून सूत्र फिरवत वेगळीच खेळी केली. (Rajyasabha Election 2022)
सध्या मतांची गोळाबेरीज पाहता महाविकास आघाडीचे इम्रान प्रतापगढी, प्रफुल्ल पटेल, संजय राऊत पहिल्या टप्प्यात विजयी होणार असल्याचं चित्र आहे. मात्र शिवसेनेच्या संजय पवार यांना ४१ मतं पडण्याची अपेक्षा आहे. यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जातोय. मात्र राष्ट्रवादीची अतिरिक्त मतं अवैध ठरल्यास पवारांना त्याचा फटका बसू शकतो.
शरद पवार यांनी रातोरात राष्ट्रवादीच्या 42 मतांचा कोटा अचानक 44 चा केला. यानंतर सेनेचे नेते रात्रीतून पवारांच्या भेटीला गेले होते. अनिल परब, अनिल देसाई, अरविंद सावंतांनी शरद पवारांची भेट घेतली. मात्र आता पवारांचा हाच निर्णय़ मविआच्या पथ्यावर पडणार आहे. राष्ट्रवादीकडे पाहता काँग्रेसनेही मतांचा कोटा 42 वरून 44 केला. त्यामुळे काँग्रेसच्या इम्रान प्रतापगढी यांनाही फायदा होणार आहे.
प्रफुल्ल पटेलांसाठी पवारांची खेळी
राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासाठीच मतांचा कोटा ऐनवेओळी बदलण्या आला होता. माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारण्यात आली होती.
विशेष न्यायालयाने त्यांना मतदानास नकार दिल्यानंतर आता समीकरणं बदलली आहेत. त्यामुळे पवारांनी तातडीने निर्णय घेतला. राज्यसभेची निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदावाराला एकूण 42 मतं लागणार आहेत. 42 मतांचा कोटा ठरलेला असताना, राष्ट्रवादीनो तो 44 केल्याचं कळतंय.
सगळी मतं सेफ?
आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांची मतं निवडणूक आयोगाने अवैध ठरवा, असं निवडणूक आयोगाने सांगितलं, तरी दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची ४३ मतं पडणार आहेत. निवडून येण्यासाठी किमान ४२ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे पवारांनी एका रात्रीत घेतलेला निर्णय़ मविआच्या बाजूने जाऊ शकतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.