sharad pawar 
महाराष्ट्र बातम्या

फडणवीस सत्तेसाठी काय करु शकतात समाजासमोर आणायचे होते, माझ्या गुगलीवर विकेट ; शरद पवारांनी स्पष्ट सांगितलं

Sandip Kapde

Sharad Pawar : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ साली अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या शपथविधीबाबत मोठा दावा केला आहे. शरद पवार यांच्याबरोबर बोलूनच सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं. फडणवीसांनी शरद पवारांवर थेट आरोप केले आहेत. दरम्यान शरद पवार यांनी या आरोपांवर उत्तर दिले आहे.

शरद पवार म्हणाले, शपथविधी आधी मी भूमिका बदलल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मी २०१४ मध्ये जाहीर बोललो होतो की राष्ट्रवादी काँग्रेस बाहेरुन पाठिंबा देईल. २०१४ निवडणूक झाल्यानंतर मी तशी भूमिका मांडली होती. भाजप आणि त्यांच्या मिंत्रांमध्ये कस अंतर पडेल याची आम्हाला काळजी घ्यायची होती.

यानंतरच्या काळात देवेंद्र फडणवीस मला भेटले हे खरे आहे. त्यांनी अनेक मुद्यांवर चर्चा केली. त्यानंतर दोन दिवसांनी मी भूमिका बदलल्याचे फडणवीस सांगतात मग त्यांनी दोन दिवसांनी सकाळी शपथ का घेतली. ती शपथ चोरून का घेतली पहाटे, असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला.

पवार म्हणाले, फडणवीसांनी शपथ घेतली आणि आमचा त्यांना पाठिंबा होता तर दोन दिवसात सरकार राहिलं का तिथं? दोन दिवसात त्यांची सत्ता गेली त्यांना राजीनामा द्यावा लागला, याचा स्वच्छ अर्थ आहे की सत्तेसाठी आम्ही कुठे जाऊ शकतो ही फडणवीसांची पाऊले समाजासमोर यावी या दुष्टीने काही गोष्टी केल्या होत्या.

शरद पवार म्हणाले, "मी फसवलं तर देवेंद्र फडणवीस का फसले. मी म्हणेल राज्यपाल व्हा तर ते येतील का?. आमच्यात बैठका झाल्या. हा राजकीय डाव होता की डबल गेम होता याचा अर्थ काय काढायचा तो काढा. मला काही माहित नाही."

यावेळी शरद पवारांनी एक किस्सा सांगितला, ते म्हणाले "माझे सासरे होते सदू शिंदे ते देशातील प्रसिद्ध गुगली बॉलर होते. मोठ्या-मोठ्या लोकांच्या विकेट त्यांनी घेतल्या होत्या. मी जगाच्या क्रिकेटचा अध्यक्ष होतो. गुगली कसा टाकायचा, कुठे टाकायचा हे जरी मी खेळलो नसलो. तरी विकेट दिली तर ती विकेट घेतलीच पाहिजे."

"त्यांची विकेट गेली हे फडणवीस सांगत नाहीत. देवेंद्र फडणवीस सत्तेसाठी कुठे जाऊ शकतात. काय करु शकतात, हे समोर आले आहे", असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Muhurat Trading Closing: मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी शेअर बाजार तुफान वाढीसह बंद, कोणते शेअर्स चमकले?

Arvind Sawant: FIR दाखल झाल्यानंतर अरविंद सावंतांची पहिली प्रतिक्रिया; म्हात्रे, शेलारांची आठवण करुन देत म्हणाले, कायदेशीर...

...तर राज ठाकरेंनी त्यांचा पक्ष बंद करावा, महायुतीतील बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य, काय म्हणाले?

Suryakumar Yadav ला कर्णधार व्हायचं होतं, त्याने मुंबई इंडियन्सला विचारलही, पण...

Latest Marathi News Updates: बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं; मुख्यमंत्र्यांची अरविंद सावंतांवर टीका

SCROLL FOR NEXT