Sharad Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : वंचित, BRS पायात पाय घालण्यासाठी तयार केलेली बी टीम ; शरद पवार असं का म्हणाले?

Sandip Kapde

Sharad Pawar :   राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीवर टीका केली आहे. वंचित पायात पाय घालण्यासाठी तयार केलेली बी टीम आहे, अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार जळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलत होत. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर महाराष्ट्रात पाया पक्का करत आहेत. त्यांनी नागपूर येथे कार्यालयाचे उद्घाटन देखील करण्यात आले. यावर शरद पवार म्हणाले, मागची निवडणूक आठवली तर थोडा फटका आम्हाला बसला होता. नुकसान सहन करावे लागेल. ते नुकसान वंचितच्या वतीने करण्यात आले. लोकशाहीमध्ये सर्वांचा अधिकार आहे.कुणाल कुठही जाऊन काम करण्याचा अधिकार आहे.

पण महाराष्ट्रात अस दिसतय की स्वत: लढायच असत आणि दुसऱ्या एकदोन टीम तयार करायच्या असतात. पायात पाय घालण्यासाठी याला राजकारणाची बी टीम म्हणतात. ही बी टीम आहे की काय आता कळेल.

शिवसेनेच्या जाहिरात राजकारणावर शरद पवारांचे भाष्य -


शरद पवार म्हणाले, आम्हालाही हे आत्ताच कळलं की महाराष्ट्राचं हे भाग्य आहे की अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एका व्यक्तीच्या बद्दलचा नावलौकिकाची जाहिरात त्यांच्या कुठल्या हितचिंतकांनी दिली हे आम्हाला माहिती नाही. आमचा समज असा होता की हे जे सरकार बनलं आहे यामध्ये मोठी संख्या ही भाजपची आहे. या जाहिरातीमुळे आम्हा लोकांच्या ज्ञानात भर पडली की, भाजपचं यामध्ये योगदान जास्त नाही अन्य घटकांच आहे. हे महाराष्ट्राला कळवण्याचं ऐतिहासिक काम या जाहिरातीच्या माध्यमातून झालं आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद.

राष्ट्रवादीत अंतर्गत गटबाजी असल्याची चर्चा सुरू आहे, यावर शरद पवार म्हणाले गटबाजी कोणी केली तर ती दुरुस्त करण्याची जबाबदारी माझी आणि जयतं पाटील यांची आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Fasal Bima Yojana : रत्नागिरी जिल्ह्याला ७८ कोटींचा विमा परतावा मंजूर; आंबा, काजू बागायतदार पात्र

Post Office Schemes : पोस्टाच्या खात्यावर आता मोठ्या रकमेचे व्यवहार,पोस्ट-आयपीपीबीचे खाते करा लिंक

Jammu Kashmir Election: मोदींमुळे पाक सीमेवर शांतता, अमित शहा यांचा दावा; काश्‍मीरमधील घराणेशाहीवर टीका

Sharad Pawar: 1 जागा अन् तिन्ही पक्षांना लढवायची असेल तर..? शरद पवारांनी सांगितली रणनीती, अंतिम उमेदवारांची घोषणा कधी?

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या घरात नवरा माझा नवसाचा 2 टीमची हजेरी ; स्पर्धकांबरोबर डान्स आणि धमाल

SCROLL FOR NEXT