Sharad Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar News: पहाटेच्या शपथविधीवेळी ठरलं होतं, आता अजित पवारांना पुन्हा संधी नाही; शरद पवार स्पष्टचं बोलले

Sandip Kapde

Maharashtra Politics : खासदार सुप्रिया सुळे यांच्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीत फूट पडल्याचे वृत्त नाकारले. अजित पवार आमचे नेते आहेत, पक्षात फूट नाही, या सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याला शरद पवार यांनी दुजोरा दिला.

लोकशाहीत पक्षाचे नेते वेगळी भूमिका घेऊ शकतात. अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतली आहे, त्याला फुटीर म्हणता येणार नाही. अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी आज (शुक्रवार) सकाळी बारामतीत बोलताना दिली होती.

यानंतर साताऱ्यात बोलताना शरद पवार यांनी अजित पवार यांना ठणकावले. अजित पवार यांना पुन्हा संधी नाही. त्यांनी संधी मागू देखील नाही. पहाटेच्या शपथविधीनंतर एकदा संधी दिली होती. आता अजित पवार यांना पुन्हा संधी नाही, असे शरद पवार म्हणाले.

प्रश्न असा आहे की एकदा, दोनदा एखाद्या व्यक्तीने वेगळी भूमिका घेतली असेल. तेव्हा व्यक्तीला आम्ही एक संधी दिली होती.  पहाटेच्या शपथविधीवेळी आम्ही आधी निर्णय घेतला होता. पण त्यानंतर जे झालं ते योग्य झालं नाही, आमच्याकडून योग्य काम झालं नाही, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली होती. त्यामुळे पक्षाने त्यांना एक संधी दिली होती. पण संधी ही नेहमी मागायची नसते. आता आमची भूमिका वेगळी आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
 

अजित पवार आमचे नेते, या वक्तव्यावर शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिले. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता.

दरम्यान, अजित पवार आमचे नेते असं मी म्हणालो नाही. सुप्रिया अजित पवारांना नेते म्हणाली होती. सुप्रिया त्यांची धाकटी बहिण आहे. त्याच्यामुळे बहिण भावांच्या नात्यात बोललेल्या गोष्टीचे राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांच्याबाबत विरोधी पक्षांच्या मनात शंका?

अजित पवार बंडखोरी करत काही आमदारांसह एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील झाले होते. मात्र तरी देखील शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सामील झाल्यापासूनच शरद पवार यांच्याबाबत विरोधी पक्षांच्या मनात शंका आहे.

या राजकीय घटनेनंतर शरद पवार यांनी अजित पवार यांची अनेकदा भेट घेतली आहे. नुकतीच एका व्यावसायिकाच्या घरी दोन्ही नेत्यांची गुप्त बैठक झाली होती. यानंतर काँग्रेसने शरद पवारांना परिस्थिती सावरण्यास सांगितले होते. मात्र, शरद पवार हे केंद्रातील भाजप सरकारवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Haryana Assembly Election 2024: हरियानात भाजपनं तिसऱ्यांदा रोवला झेंडा! 'या' व्यक्तीमुळं साधली दमदार हॅटट्रिक

Share Market Closing: शेअर बाजाराचे कमबॅक; सेन्सेक्स 81,634 अंकांवर बंद, मिडकॅप निर्देशांकात मोठी वाढ

Nobel Prize 2024 : फिज़िक्समध्ये जॉन जे. हॉपफील्ड आणि जेफ्री ई. हिंटन यांना नोबेल जाहीर; दोघांनी बनवलं अनोखं न्युरल नेटवर्क

Latest Maharashtra News Live Updates : रामराजे निंबाळकर अखेर १४ ऑक्टोबरला राष्ट्रवादीत प्रवेश करणार

Chalisgaon MSRTC Depot : सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या चाळीसगाव आगारात नव्या बसगाड्यांची वानवा; 25 वर्षांपासून जुन्याच गाड्यांमधून प्रवाश

SCROLL FOR NEXT