ajit pawar and sharad pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Crisis: राष्ट्रवादीतील संघर्ष ECमध्ये सुरू! अजित पवार गटाच्या आमदारांविरोधात शरद पवार गटाचा मोठा निर्णय

शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आले आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आले आहे. अजित पवार गटाने केलेले सर्व दावे शरद पवार गटाने फेटाळले आहेत. मंत्र्यासोबत अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांविरोधातही शरद पवार गटाने अपात्रतेची याचिका दाखल केली आहे.

९ मंत्र्यासोबत ३१ आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. यातील विधानपरिषदेचे आमदार असल्याची माहिती आहे. आता शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसची लढाई आता निवडणूक आयोगासमोर सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आतापर्यंत एकूण आमदारांपैकी किती आमदार अजित पवार यांच्याकडे आणि किती शरद पवार यांच्याकडे हा आकडा स्पष्ट झालेला नव्हता तो आता समोर आला आहे.

आतापर्यंत दोन्ही गटाकडून आकडेवारी जाहिर करण्यात आलेली नव्हती. मात्र निवडणूक आयोगासमोर याचिका दाखल करताना शरद पवार गटाने ९ मंत्र्यांशिवाय ३१ आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

गेल्या काही दिवसांपुर्वी अजित पवार यांच्यासह पक्षातील ८ नेत्यांनी राज्यातील शिवसेना- भाजप सरकारला पाठिंबा दिला आणि मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फुट पडली. पक्षात दोन गट निर्माण झाले. शरद पवारांनी अजित पवारांची भुमीका राष्ट्रवादी पक्षा विरोधातील असल्याचे जाहीर केले होते. आता दोन महिन्यानंतर यासंदर्भातील उत्तर निवडणूक आयोगासमोर शरद पवार गटाने सादर केलं आहे.

अजित पवार गटालाही उत्तर देण्याची आजची तारीख देण्यात आलेली आहे. दरम्यान शरद पवार गटाकडून काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली असल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्यांदाच आमदारांचा आकडा समोर आला आहे. ९ मंत्र्यांच्या अपात्रतेच्या संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली होती. मात्र आता ३१ आमदारांच्या अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. त्याशिवाय यातले चार विधान परिषद आमदार असल्याची माहिती समोर आली आहे. 

तर अजित पवार गटाकडून करण्यात आलेले सर्व दावे शरद पवार गटाने फेटाळले आहे. अजित पवारांनी आपण राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा, पक्ष आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला होता तो शरद पवार गटाने फेटाळला आहे. २०२२ मध्ये पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी झाली होती त्याची देखील काही पुरावे देण्यात आल्याची माहिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: अगं बाळे, घाबरून कसं चालेल? लेकीच्या काळजीने अजितदादा कसे गलबलले; सुनेत्रा पवारांनी सांगितला अनुभव

Latest Maharashtra News Updates : शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर राज ठाकरे यांच्या भेटीला

Ola Electric Stock Crash: ओला इलेक्ट्रिकला मोठा झटका! शेअर उच्चांकावरून निम्म्यावर घसरला, काय कारण आहे?

संकटासमोर सलमान पाय रोवून... सीमा सजदेहने केलं दीराचं कौतुक, म्हणाली- मलायकाच्या वडिलांच्या निधनावेळी तो

Congress Candidates: विधानसभेसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, विद्यमान आमदाराचे कापले तिकीट; जाणून घ्या कुणाला मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT