sharad pawar ajit pawar  esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Political Crisis: अजित पवारांना नवीन चिन्ह मिळणार? सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण मेन्शन, 'या' तारखेला सुनावणी

संतोष कानडे

NCP News: शरद पवारांना सोडून अजित पवारांनी भाजपशी घरोबा केल्यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवारांकडेच राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह दिलं. आमदारांच्या संख्येवरुन हा निर्णय घेण्यात आलेला होता. आता त्यांना नवीन चिन्ह मिळावं, यासाठी एक प्रकरण मेन्शन करण्यात आलेलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह या प्रकरणाचा सुप्रीम कोर्टातील निकाल लागत नाही तोपर्यंत अजित पवार यांना नवीन चिन्ह द्यावं, अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे. अजित पवार यांना नवीन चिन्ह घेण्याची मागणी करायला सांगा कारण निवडणूक आयोगाने जो निकाल दिला आहे तो आमदारांच्या आधारावर दिला आहे, असं शरद पवार गटाचं म्हणणं आहे.

त्यामुळेच सुप्रीम कोर्टाने विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांना नवीन चिन्ह घेण्यास सांगावं, असं म्हणत शरद पवार यांच्या पक्षाने शुक्रवारी सुप्रीम कोर्टात प्रकरण मेन्शन केलं आहे. हे प्रकरण लवकर ऐकण्याची कोर्टाकडे विनंती करण्यात आलेली आहे.

या नवीन प्रकरणाची सुनावणी २५ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. नक्की सुनावणी कधी होणार, हे शनिवारी कोर्टाच्या लिस्टमधून स्पष्ट होईल. यापूर्वी देखील दोनवेळा शरद पवार यांच्या पक्षाकडून हे प्रकरण मेन्शन करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र कोर्टाने त्यावर सुनावणी घेतली नव्हती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharavi : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन देऊनही सकाळी...; पालिकेच्या कारवाईवर वर्षा गायकवाड संतापल्या

Period Leave : आता महिला कर्मचाऱ्यांना दरवर्षी मिळणार सहा दिवसांची मासिक पाळी रजा; सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

IND vs BAN 1st Test : 634 दिवसांनी कसोटी खेळला अन् Rishabh Pant ने झळकावले शतक; महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाशी बरोबरी

Phullwanti Trailer: एकदा पाहा, नजर हटणारच नाही! प्राजक्ताच्या 'फुलवंती'चा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित; कलाकारांच्या लूकने वेधलं लक्ष

Latest Marathi News Updates : स्थानिकांनी घातला धारावी पोलीस ठाण्याला घेराव

SCROLL FOR NEXT