Sharad Pawar: अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने (EC) मंगळवारी केली. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आयोगाचा हा निर्णय पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्यासाठी मोठा धक्का आहे. आयोगाने आपल्या आदेशात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह 'घड्याळ' दिले आहे. आता शरद पवार गटाचा पक्ष राहिला नसून, नव्या पक्षाच्या स्थापनेसाठी त्यांना आज ४ नावे निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहेत.
आयोगाने शरद पवार यांना सांगितले आहे की, ते त्यांचा नवा पक्ष स्थापन करण्यासाठी आयोगाला कोणतीही ४ नावे देऊ शकतात. त्यासाठी आयोगाने शरद पवार गटाला बुधवारी दुपारी चार वाजेपर्यंत मुदत दिली आहे. दरम्यान शरद पवार गटाकडून निश्चित केलेल्या पण अन् चिन्हांनी नाव समोर आली आहेत.
पक्षाचे नाव-
शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी आणि शरद स्वाभिमानी पक्ष
चिन्ह-
कपबशी, सूर्यफूल, चष्मा आणि उगवता सूर्य
दरम्यान पक्ष-चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार यांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. देवगिरीवर मंगळवारी झालेल्या बैठकीत अजित पवारांनी ह्या सुचना दिल्या आहेत. आपल्याला जनमताच्या आधारावर पक्ष-चिन्ह मिळाल, त्याचा मान राखा, असे अजित पवार म्हणाले. जाहीरपणे बोलताना वाद होईल, अशी वक्तव्ये टाळा, पक्ष-चिन्ह मिळाल्याचा आनंद असला तरी उन्माद होऊ देऊ नका. यापुढे अधिकाधिक लोकप्रतिनिधी कसे निवडून येतील, यासाठी जोमाने कामाला लागा, असे अजित पवार म्हणाले. (Latest Marathi News)
आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष शिथिलता देत, आयोगाने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाला त्यांच्या राजकीय पक्षाचे नाव सांगण्यासाठी आणि तीन पर्याय देण्यासाठी बुधवारी दुपारी 4 वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीची अधिसूचना गुरुवारी जारी होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.