BJP Chandrashekhar Bawankule On NCP chief Sharad Pawar death threat row esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: ऐतिहासिक काम 'त्या' जाहिरातीमुळं झालं! पवारांनी मारले शालीजोडे

शिवसेनेनं वर्तमानपत्रांना दिलेल्या जाहिरातीवरुन राज्यात सध्या जो वाद सुरु आहे, त्यावर शरद पवारांनी भाष्य केलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

जळगाव : शिवसेनेनं वर्तमानपत्रांना दिलेल्या जाहिरातीचा वाद राज्यात सुरु असताना ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी देखील यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आणि शिवेसेनेला शेलक्या शब्दांत शालजोडे लगावले आहेत. (Sharad Pawar historical work was done by shivsena advertisement says Sharad Pawar)

पवार म्हणाले, "आम्हालाही हे आत्ताचं कळलं की महाराष्ट्राचं हे भाग्य आहे की अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एका व्यक्तीच्या बद्दलचा नावलौकिकाची जाहिरात त्यांच्या कुठल्या हितचिंतकांनी दिली हे आम्हाला माहिती नाही.

आमचा समज असा होता की हे जे सरकार बनलं आहे यामध्ये मोठी संख्या ही भाजपची आहे. या जाहिरातीमुळं आम्हा लोकांच्या ज्ञानात भर पडली की, भाजपचं यामध्ये योगदान जास्त नाही अन्य घटकांच आहे. हे महाराष्ट्राला कळवण्याचं ऐतिहासिक काम या जाहिरातीच्या माध्यमातून झालं आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद" (Latest Marathi News)

या जाहिरातीमुळं भाजप आणि शिवसेनेत कुरबुरी सुरु झाल्या आहेत. त्यामुळं मोठ्या टीकेनंतर शिवसेनेला पुन्हा जाहिरात देत खुलासा द्यावा लागला होता, यावर भाष्य करताना पवार म्हणाले, एवढ्या मोठ्या जाहिरातील सर्व पेपरना दिल्या आहेत. प्रिंट मीडियाच्या दृष्टीनं ही लाभदायक गोष्ट ठरली आहे. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT