महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: शरद पवारांनी ज्येष्ठ नेत्यांना दिल्या सूचना; बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आज बैठक पार पडली.

धनश्री ओतारी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आज बैठक पार पडली. यावेळी पवार यांनी पक्षातील नेत्यांना कानपिचक्या मारत आमदारांना सूचना दिल्या. (Sharad Pawar holds meeting with NCP leaders for Lok Sabha assembly polls )

यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक पार पडली. यावेळी राज्यातील व देशातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या सद्यस्थितीचा शरद पवार यांनी आढावा घेतला. तसेच काही सूचना देखील दिल्या.

महाविकास भक्कम ठेवा. लोकसभा विधानसभा मविआतूनच लढू, अशी सूचना देत राष्ट्रवादी सोडण्याच्या वाटेवर असलेल्या नेत्यांचे शरद पवार यांनी कान टोचले.

बैठकीत नेमकं काय घडलं?

महाविकास आघाडीतच लोकसभा - विधानसभा निवडणूक लढवायची आहे. कर्नाटक मध्ये जो ट्रेण्ड आहे तो महाराष्ट्रात आहे. भाजप नको. त्यांची सत्ता येऊ नये असा मतदाराणी कौल दिला आहे. जनमत भाजप विरोधात आहे. जो पक्ष भाजप बरोबर जाईल त्यांना कर्नाटक मद्ये मत दिले नाही. तसेच महाराष्ट्रात चित्र आहे. अस बैठकीत पवार यांनी नेत्यांना सांगितलं आहे.

तसेच, ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी दोन क्रमांक वर आहे त्याची जबाबदारी विभागावर नेत्यांना दिली आहे. उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी एकनाथ खडसे, कोकण - सुनिल तटकरे आणि ठाणे पालघरची धुरा जितेंद्र आव्हाड यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

IND vs AUS, BGT: चेतेश्वर पुजारा भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत दिसणार; पण फलंदाज म्हणून नाही, तर...

Kalyan: प्रचार अर्धवट सोडून उमेदवार सुलभा गायकवाड धावल्या मदतीला..!

आता तो पूर्वीसारखा नाही राहिला! अंगावर जखमा, हातात सुरा; ‘बागी ४’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर समोर

Curry Leaves Health Benefits: औषधी गुणधर्म असलेला कढीपत्ता 'या' गंभीर आजारांना ठेवतो दूर

SCROLL FOR NEXT