पुणे: पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या असून आता देशामध्ये आगामी 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीची चर्चा सुरु झाली आहे. मोदी आणि भाजपला शह देणारा कोणताही प्रबळ असा दावेदार आणि विरोधी पक्षच सध्या अस्तित्वात नसल्यामुळे विरोधकांच्या आघाडीबाबतची चर्चा सातत्याने डोकं वर काढताना दिसते. यूपीएचं नेतृत्व गांधी कुटुंबियांशिवाय अथवा काँग्रेसव्यतिरिक्त कुणीतरी करावं अथवा काँग्रेसशिवायच्या तिसऱ्या आघाडीच्या चर्चाही सातत्याने होता दिसतात. अलिकडे राष्ट्रवादीच्या युवक आघाडीने विरोधी पक्षांचं नेतृत्व शरद पवारांनी (Sharad Pawar) करावं असा ठराव पारित केला होता तर दुसरीकडे ममता बॅनर्जी मोदींना टक्कर देऊ शकतील, अशाही चर्चा डोकं वर काढताना दिसतात. या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपलं मत मांडलं आहे. (Prakash Ambedkar)
प्रकाश आंबेडकर यांनी यूपीए - दोनच्या नेतृत्वासाठी ममता बॅनर्जी यांच्या बाजूने कौल दिला आहे. ममता बॅनर्जी यांनी यूपीए दोनचं नेतृत्व करावं, ते नाव विश्वासार्ह वाटतं, असं त्यांनी म्हटलं आहे. हे सांगताना इतर कोणताही पर्याय विश्वासार्ह नसल्याचंच त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय. थोडक्यात, शरद पवार (Sharad Pawar) हे देखील नेतृत्वासाठी विश्वासार्ह नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांना वाटतं.
याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय की, यूपीए दोनसाठी मी ममता बॅनर्जींना विश्वासार्ह मानतो. ममतांशिवाय उरलेल्या इतर कोणत्याही पर्यायावर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती आहे, असं मी मानत नाही. इतर पर्याय विश्वासार्ह नाहीत, असं मला वाटतं. पवारांवरही (Sharad Pawar) विश्वास नाही का, या प्रश्नावर ते म्हणाले की, मी इतर कुणाचंच नाव घेत नाहीये. अखिलेश, स्टालिन या कुणाहीपेक्षा ममता बॅनर्जी अधिक विश्वासार्ह आहेत. मात्र, ममतांशिवाय इतर कुणीही विश्वासार्ह नाही असं मला वाटतं असं त्यांनी म्हटलंय. (Prakash Ambedkar)
'शरद पवारांना करावं प्रमुख'
भारतीय जनता पक्षाला जर रोखायचे असेल तर सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. ही गरज पाहता गेल्या मंगळवारी (ता.२९) राष्ट्रवादी युवक काँग्रेसची दिल्ली येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली होती. यात शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेस (Congress Party) आणि इतर पक्षांचे नेतृत्व करावे, असा प्रस्ताव मांडण्यात आला. स्वतः पवार यावेळी उपस्थित होते. सदरील प्रस्ताव मंजूरही करण्यात आला होता. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) हे देशातील सर्वात अनुभवी नेत्यांपैकी एक असून त्यांनी देशाचे संरक्षण आणि कृषी मंत्री म्हणून देशाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे ते नेतृत्व करु शकतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला होता. (Prakash Ambedkar)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.