Sharad Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : ‘लाडकी बहीण’ची शाश्वती नाही,पवार

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध घोषणांचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, विद्यार्थिनींना शंभर टक्के फी माफी या योजना निश्चितच चांगल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

सातारा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध घोषणांचा सपाटा लावला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, विद्यार्थिनींना शंभर टक्के फी माफी या योजना निश्चितच चांगल्या आहेत. मात्र, सरकारच्या अर्थसंकल्पात या योजनांसाठी तरतूद न करता अर्थसंकल्पानंतर सरकार अशा घोषणा जाहीर करत आहे. त्यामुळे भविष्यात या योजनांची शाश्वती देता येत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार शरद पवार यांनी राज्य सरकारच्या घोषणांवर केली.

जकातवाडी (ता. सातारा) येथील भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेच्या विविध पुरस्कारांचे वितरण कार्यक्रमानंतर खासदार शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पवार म्हणाले, ‘‘राज्य सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार करत असते. सध्याच्या परिस्थितीत राज्यावर कर्जाचा डोंगर आहे. आर्थिक अडचणी सरकारपुढे आहेत. अनेक योजनांसाठी, विकासकामांसाठी निधी मिळत नाही. एवढेच नव्हे तर शासकीय वसतिगृहांची अनुदाने दोन वर्षे रखडली आहेत. एकीकडे राज्य अडचणीत असताना अर्थसंकल्पात तरतूद नसताना लाडकी बहीण योजना व विद्यार्थिनींना शंभर टक्के फी माफीची घोषणा करत आहे.

त्यामुळे भविष्यात या योजना टिकतील, याची शाश्वती दिसत नाही. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. वास्तविक, या दोन्ही योजना चांगल्या असून, सरकार जर या योजनांना निधी देणार असेल आणि महिलांना लाभ मिळणार असेल, तर आम्हीही जास्तीतजास्त महिलांना मार्गदर्शन करून त्यांचे अर्ज भरण्यासाठी पुढाकार घेऊ.’’ मराठा आरक्षणाबाबत आज मुंबईत बैठक होती. मात्र, खराब हवामानामुळे या बैठकीस उपस्थित राहता येत नाही. सरकारने हा विषय चर्चेतून मार्गी लावण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

जयंत पाटलांच्या संपर्कात आमदार

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार आपल्या संपर्कात असून, त्यांना पक्षात सामावून घेणार का? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, ‘‘सध्या माझ्या संपर्कात कोणीही आमदार नाहीत. मात्र, जयंत पाटील यांच्या संपर्कात कोणी असतील, तर मला सांगता येणार नाही. निवडणूक आयोगाने आमच्या पक्षाला मान्यता दिल्याने विधान परिषद निवडणुकीत पक्षाची ताकद निश्चित वाढेल. पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबतही न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तोही निकाल आमच्या बाजूने लागेल,’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT