Sharad Pawar  sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : ना.धों. महानोर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली ; पवारांनी दिला आठवणींना उजाळा

Sharad Pawar :

सकाळ डिजिटल टीम

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज ना.धों. महानोर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. त्यांच्या पळसखेड येथील आनंदयात्री या निवासस्थानी घेतली.

यावेळी शरद पवार यांनी ना. धों. महानोर यांचे चिरंजीव डाॕ. बाळासाहेब महानोर, गोपाळ महानोर, भाऊ पुंडलिक महानोर, मुली मिरा, सरला, रत्ना व नातु शशीकांत व नातवंड यांच्याशी पारिवारिक संवाद साधला. आनंदयात्री या निवासस्थानी जवळपास अर्धा तास कुटुंबाची भेट घेऊन विचारपूस केली.

यावेळी ना.धों. महानोर यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना साहित्याच्या माध्यमातून व राजकीय माध्यमातून वाचा फोडल्याचे शरद पवार म्हणाले. १९८० साली जळगाव पासून जी शेतकरी दिंडी काढण्यात आली. त्याच्या आयोजनामध्ये कवी ना. धो. महानोर यांचा पुढाकार होता. जळगाव ते नागपूर अशा निघालेल्या या दिंडीमध्ये मा. यशवंतराव चव्हाण साहेब, प्रा. एन. डी. पाटील, गणपतराव देशमुख व मी स्वतः तसेच प्रल्हादभाऊ पाटील व अनेक मान्यवर नेते सहभागी झाले होते असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

यावेळी माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे, माजी खा. जयसिंगराव गायकवाड, जैन इरिगेशन सि.लि. कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, रंगनाथ काळे, माजी आमदार किशोर पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डाॕ. सुधीर भोंगळे, विजय बोराडे, ॲड. रविंद्र पाटील, संजय गरुड, डि. के. पाटील, जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व साहित्यप्रेमी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Worli Vidhan Sabha Voting: शेवटच्या एका तासात मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंचं टेन्शन वाढवलं; ठाण्याकडे निघालेला दौरा वरळीकडे वळला...

Vikramgad Assembly constituency Voting : मोखाड्यात मतदान यंत्राची संथ गती, सुर्यमाळ मध्ये रात्री ऊशीरा पर्यंत मतदान 

Assembly Election Voting 2024 : मतदान केंद्रावर राडा नडला! मतदान संपण्याआधीच उमेदवाराला पोलिसांनी केली अटक

Jharkhand Exit Poll: झारखंडमध्ये भाजप आघाडीला बहुमत; काय सांगताएत एक्झिट पोल?

Paithan Assembly Constituency Voting : आडुळ येथे शांततेत मतदान राञी उशीरा पर्यंत रांगा...

SCROLL FOR NEXT