महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: आयाराम वाढवणार पवारांच टेंशन; या निष्ठावान नेत्याने दिला बंडखोरीचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

Maharashtra Political News: देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. पण, येथून इच्छुक उमेदवारांना डावलून महाविकास आघाडीने भाजप व इतर पक्षांतील आयात उमेदवाराला उमेदवारी दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे इच्छुक उमेदवार जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढण्याचा इशारा दिला आहे.

या मतदारसंघातून महायुती, महाविकास आघाडी आदी पक्षांकडून अनेक इच्छुक उमेदवार रिंगणात आहेत. असे असले तरी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या मतदारसंघाचे विद्यमान आमदार जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेस पक्षामधून भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे भाजपकडून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

तर, भाजपकडून इच्छुक असलेल्या एका माजी आमदाराची मात्र कोंडी झाली आहे. त्यामुळे ते आता महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी, यासाठी आघाडीच्या नेत्यांच्या मुंबईमध्ये भेटीगाठी घेऊन प्रयत्न करीत

असल्याची जोरदार चर्चा देगलूर-बिलोली मतदारसंघात होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या इच्छुक उमेदवारांमध्ये आता अस्वस्थता पसरली आहे.

मतदारसंघात महाविकास आघाडीकडून अनेक जुने जाणते, निष्ठावंत, अभ्यासू कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. पण, अशा निष्ठावान कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीने डावलून भाजप व इतर पक्षातील आयात उमेदवाराला उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शरद पवार गटाच्या सुभाष गायकवाड यांनी बंडखोरीचे संकेत दिले आहेत.

तसेच, अपक्ष निवडणूक लढण्याचा इशारा महाविकास आघाडीला दिला आहे. या इशाऱ्यामुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrakant Handore Son Arrested : काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरेंच्या मुलाला अटक! शुगर वाढल्याने रुग्णालयात केलं दाखल

Tanush Kotian, मुंबईचा तारणहार अन् ‘खडूस’ खेळाडू! टीम इंडियाचा भविष्यातील R Ashwin

Pune Crime : इनशर्ट नाही म्हणून... पुण्यात शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारलं; मुलाच्या कान अन् नाकातून आलं रक्त

जिनिलियाने सासूबाईंबरोबर केली नवरात्रीची पूजा ! देशमुखांच्या सुनांचं होतंय कौतुक

Latest Marathi News Live Updates: हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक असणारे नितेश राणे आता संविधानाच्या मुद्द्यावरही आक्रमक

SCROLL FOR NEXT