Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Latest News : चक्क 48 आमदार सोडून गेल्यावरही पक्ष कसा नव्याने उभा करायचा, पवारांना माहित आहे...

NCP Political Crisis : यापूर्वीही पवारांच्या पक्षातून मोठ्या संख्येने आमदार सत्ताधारी पक्षात निघून गेले. पण त्यानंतर त्यांनी पुन्हा नव्याने पक्ष बांधणी केली आणि राजकारणात आपले पाय रोवून ठेवले.

धनश्री भावसार-बगाडे

Rashtravadi Congress : सत्ताधारी पक्षाकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश आमदार निघून जाऊन पक्षाचे पद जाण्याची ही काही पहिली वेळ नाही. अजित पवार आणि इतर आमदार शिंदे-फडणवीस सरकारला जाऊ मिळाले त्यामुळे शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष खिळखीळा झाल्याचे बोलले जात आहे. पण हा अनुभव शरद पवार यांच्यासाठी अजिबात नवा नाही.

यापूर्वीही पवारांच्या पक्षातून मोठ्या संख्येने आमदार सत्ताधारी पक्षात निघून गेले. पण त्यानंतर त्यांनी पुन्हा नव्याने पक्ष बांधणी केली आणि राजकारणात आपले पाय रोवून ठेवले.

Sharad Pawar

याविषयीचा किस्सा त्यांनी आपले आत्मचरीत्र 'लोक माझे सांगाती' यात याविषयीचा किस्सा विस्तृतपणे सांगितला आहे.

देशात आणि महाराष्ट्रात इंदिरा काँग्रेसला कौल

१९८० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत इंदिरा काँग्रेसला जनतेचा कौल मिळाला. देशात त्यांचीच सत्ता होती. त्यामुळे शरद पवार यांच्या काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू झाली. मुळ काँग्रेस कोणती असा प्रश्न निर्माण झाला. यशवंतराव चव्हाण यांचे इंदिरा काँग्रेसशी जुळवून घ्यावे असे मत होते, शिवाय खऱ्या काँग्रेसचा कौल जनतेने दिला असं त्यांचं मत होतं. त्यांच्या या भूमिकेमुळे पक्षाचे आमदार टिकवणं कठीण होणार, याचा शरद पवार यांना अंदाज आला होता.

Sharad Pawar

पक्षात पडझड

दौऱ्यानिमित्त पवार लंडनला गेले आणि पक्षात पडझड सुरू झाली. त्यांच्या ५४ पैकी ६-७ सोडून सारे आमदार म्हणजे सुमारे ४८ आमदार ‘ इंदिरा काँग्रेस'मध्ये गेले. कमलकिशोर कदम, पद्मसिंह पाटील, मालोजीराव मोगल आणि आणखी दोघे आमदार तेवढे पवारांबरोबर राहिले. पण त्यांचं विरोधी पक्षनेतेपद गेलं.

ते लंडनहून परतल्यावर विमानतळावर पाहिलेलं दृश्य मात्र थक्क करणारं होतं. प्रचंड संख्येनं युवक जल्लोषात त्यांचे स्वागत करीत होते. आपल्यामागे लोकप्रतिनिधी किती आहेत, यापेक्षा तरुणांचा आणि जनतेचा भरवसा आपल्यावर असल्याची अनुभूती त्या स्वागतामुळे त्यांना मिळाली. आमदारांच्या सोडून जाण्यानं मनात निर्माण झालेल्या अस्वस्थतेवर तरुणांच्या पाठिव्यामुळे उमेद रोवली गेली. आपण पुन्हा शून्यातून जग उभं करू, अशा निर्धाराने ते दुसऱ्या दिवसापासून कामाला लागले.

Sharad Pawar

नवी उमेद, नव्याने उभारणी

पक्षाची ताकद क्षीण झालेली होती. पुन्हा एकदा संघटना बांधायची, लोकांशी थेट संवाद साधायचा, जनतेचे प्रश्न हातात घेऊन संघर्ष करायचा, असं ठरवून त्यांनी सुरुवात केली. विरोधी बाकावर आत्मपरीक्षण करण्यासाठी अवधी मिळाला होता. आपण सत्तेत असताना घेतलेल्या निर्णयांचे नेमके काय परिणाम झाले आहेत, त्यांची अंमलबजावणी कशी होते आहे, हे प्रत्यक्ष जनतेत मिसळून जाणून घेण्याची संधी मिळाली आहे, असं मानून ती वेळ कारणी लावण्याची सुरुवात त्यांनी केली.

महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी कार्यक्रम आखले. आठवड्यातले पाच दिवस राज्यभर दौरे करायचे. त्यात समाजातल्या वेगवेगळ्या घटकांशी अनौपचारिक गप्पागोष्टी करण्यावर त्यांनी अधिकाधिक भर दिला. औपचारिकता बाजूला सारल्यामुळे मतमतांतरं स्पष्टपणानं ऐकता आली. आणि नव्या उमेदीने पुन्हा नव्याने पक्षाची मूठ बांधली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Crash: फेड रिझर्व्ह ते डॉलर इंडेक्स...'या' 5 कारणांमुळे शेअर बाजार आणखी कोसळणार; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

Baramati Assembly News: बारामतीत खळबळ! श्रीनिवास पवारांच्या शरयू मोटर्समध्ये रात्री सर्च ऑपरेशन, काय म्हणाले युगेंद्र पवार ?

थोडक्यात वाचला! फलंदाजाचा स्ट्रेट ड्राईव्ह अन् अम्पायरचा चेहरा...; भारतीय संघ सराव करतोय त्या 'पर्थ' येथे घडला प्रकार

Latest Marathi News Updates : पुण्यात अजूनही उमेदवारांकडून प्रचार सुरू

Ramesh Kadam: शरद पवार गटाच्या नेत्याच्या अपहरणाचा प्रयत्न, म्हणाले-बाबा सिद्दिकींप्रमाणे माझी हत्या करण्याचा डाव

SCROLL FOR NEXT