Ajit Pawar Sharad PAwar Sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! अजित पवारांच्या शपथविधी सोहळ्याला शरद पवारांचा पाठिंबा नाही | Ajit Pawar

दत्ता लवांडे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वांत मोठी घडामोड सध्या घडत असून अजित पवार आपल्यासोबत जवळपास ३० ते ४० आमदारांना घेऊन भाजप शिंदे सरकारमध्ये सामील होणार आहेत. अजित पवार हे सध्या त्यांच्याकडे असलेल्या विरोधीपक्षनेतेपदाचा राजीनामा देणार असून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पण या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा पाठिंबा नसल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीमध्ये पहिल्यांदाच बंड होत असून अजित पवार यांना पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये कोणतेच पद न दिल्याने ते नाराज होते असं सांगण्यात येत आहे. तर शरद पवार यांचा या शपथविधी सोहळ्याला पाठिंबा नसल्यामुळे आता राजकारणाची पुढची दिशा कशी असेल हे पहावं लागणार आहे.

आज शपथ घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 आमदारांची संभाव्य यादी

अजित पवार

छगन भुजबळ

दिलीप वळसे पाटील

धनंजय मुंडे

हसन मुश्रीफ

अनिल भाईदास पाटील

आदिती तटकरे

संजय बनसोडे

बाबूराव अत्राम

शरद पवार यांचे निकटवर्तीय असेलेले हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे हे नेते अजित पवार यांच्यासोबत गेल्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का मानावा लागेल. तर अजित पवार आता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून त्यांच्यासोबत ९ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या ३० ते ४० आमदारांचा पाठिंबा असल्याची माहिती समोर आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena: शहाजीबापुंच्या विरोधात ठाकरेंची मोठी खेळी, अजित पवारांच्या बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल! उद्धव ठाकरे, म्हणाले...

IND vs NZ 1st Test : आता आमची सटकली...! Virat Kohli - सर्फराज खान यांची तुफान फटकेबाजी; भारताचा न्यूझीलंडवर पलटवार

पोट धरून हसाल! आईसक्रीम खात IND vs NZ मॅच पाहणाऱ्या फॅनची शास्त्रींनी उडवली खिल्ली ; Funny Video

Latest Maharashtra News Updates : मुंबईतील धार्मिक संस्थांचा पाठिंबा मिळविण्यासाठी भाजपने रणनीति आखली

बैठकीला नाना पटोले उपस्थित असतील तर...; ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बिनसलं? जागांचा वाद विकोपाला

SCROLL FOR NEXT