Narendra Modi Sharad Pawar 
महाराष्ट्र बातम्या

माहित नव्हतं एवढं महागात पडेल; मोदींच्या ‘त्या’ विधानावर शरद पवारांची प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार सातत्याने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका करत आहेत. त्यातच शरद पवार यांना पंतप्रधान मोदींनी काही वर्षांपूर्वी केलेल्या विधानावरून प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी मिश्कील उत्तर देत फिरकी घेतली. (Sharad pawar, Narendra Modi news in Marathi)

बारामती येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांचे कौतुक केले होते. तसेच त्यांचं बोट धरून आपण राजकारणात आल्याचं म्हटलं होतं. या संदर्भात पवार यांना विचारण्यात आलं की, मोदी तुमचं बोट धरून राजकारणात आले. त्यावर पवार म्हणाले की, "मला कल्पना नव्हती की हे इतके महाग पडेल.

यावेळी शरद पवार म्हणाले की, बिगरभाजप पक्षांना एकत्र आणण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न सुरू आहे. मात्र आपण वयामुळे कोणतीही जबाबदारी घेणार नाही. ते ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर निशाणा साधला.

मोदी सरकारने 2014 पासून 'अच्छे दिन' आणण्याचे वचन दिले होते. इंटरनेटद्वारे गावे जोडणी केली जाईल, प्रत्येक घरात शौचालय, पाणी आणि वीज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते अद्याप पूर्ण केले नाही. केवळ छोट्या पक्षांना सत्तेतून बेदखल करणे हेच भाजपचे उद्दिष्ट असल्याचे पवार म्हणाले.

ते म्हणाले, "भाजपेतर पक्षांना एकत्र आणण्यासाठी आणि भाजपच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विरोधात जनमत तयार करण्यासाठी मी बिगर-भाजप पक्षांना एकत्र आणण्यास मदत करणार असल्याचही पवार यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba siddiqui case: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचणाऱ्या शुभम लोणकरच्या निशाण्यावर पुण्यातील बडा नेता; पोलिस तपासात धक्कादायक माहिती

Supriya Sule: बुलेट ट्रेनसाठी करोडो रुपये खर्च करतात; पण मुलांच्या शिक्षणासाठी निधी नाही, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai Temperature: मुंबईच तापमान पुन्हा वाढलं, कमाल तापमान ३६.८ अंशांवर

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT