Sharad Pawar News esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : हे घडवलं जातंय! संगमनेर, कोल्हापूरच्या घटनांवरून पवारांचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

रोहित कणसे

संगमनेर आणि कोल्हापूर येथे झालेल्या दंगलीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. शरद पवारांनी अशा प्रकारांना सत्ताधारी पक्षाकडून प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोप देखील केला आहे. संभाजीनगर येथे झालेल्या पत्रकार परिषजदेत पवार बोलत होते.

राज्यत तसेच देशात दंगली रोखण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीयेत का? याबद्दल विचरण्यात आलेल्या प्रश्नाला शरद पवारांनी उत्तर दिलं. संगमनेर आणि कोल्हपूर दंगली विषयी बोलताना पवार म्हणाले की, सकाळी नगरमध्ये संगमनेर येथे काहीतरी झालं अशी बातमी पाहिली. त्यानंतर कोल्हापूरला कुणीतरी मोबाइलवर मेसेज पाठवला, तो चुकीचा असेलही, नाही असं नाहू, पण म्हणून लगेच रस्त्यावर उतरून त्याला धार्मिक स्वरुप देणं योग्य नाही. आज सत्ताधारी पक्ष अशा गोष्टींना प्रोत्साहित करतो.

पुढे बोलताना पवार म्हणाले की, राज्यकर्त्यांची जबाबदारी शांतता आणि सुव्यवस्था निर्मण करणे आहे. राज्यकर्ते आणि त्यांचे सहकारीच रस्त्यावर येऊ लागले आणि त्यामुळे दोन गटांमध्ये कटूता निर्माण होत असेल तर ही काही चांगली गोष्ट नाही असे शरद पवार म्हणाले. राज्यकर्त्यांचं लक्ष पायाभूत सुविधा, पाणी, रस्ते, वीज, आरोग्य शैतक्षणिक सुविधा यांच्यावर अधिक असायला हवे असेही शरद पवार म्हणाले.

मर्यादित भागाच झालं असेल तर चांगली गोष्ट आहे. पण हे घडवलं जात आहे. आज सकाळी टीव्हीवर पाहिलं कोणीतरी औरंगजेबाचा फोटो दाखवला त्यासाठी पुण्यात दंगल करण्याचं काय कारण आहे? पुण्यात आंदोलन करण्याचं काय कारण आहे? औरंगजेबाचा फोटो दाखवला म्हणून काय परिणाम होतो मला कळत नाही, असेही शरद पवार म्हणाले.

एकेरी उल्लेखावर पवारांची प्रतिक्रिया

पत्रकार परिषदेत बोलताना राज्यातील काही भाजपचे नेते तुमचा एकेरी भाषेत उल्लेख करत आहेत, यावर प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी दोनच शब्दात हा विषय संपवला. ठिक आहे, कशाला महत्व देताय इतकंच उत्तर पवारांनी दिलं.

संगमनेर अन् कोल्हापूरात काय झालं

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये ६ जून, मंगळवार रोजी सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या भगवा मोर्चानंतर परिस्थिती चिघळल्याचं पाहायला मिळालं होतं. या मोर्चावर समाजकंटकांनी दगडफेक केल्याची घटना घडली होती. त्यामुळे संगमनेरच्या सामनापूर गावात दोन गटात तणावाचे वातावरण निर्माण झाला होता. तर कोल्हापूरात काल तरुणांनी व्हाट्सअॅपवर वादग्रस्त स्टेटस ठेवल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. शहरात काही ठिकाणी घर, दुकानांवर दगडफेक देखील झाली. यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT