Sharad Pawar Politics esakal
महाराष्ट्र बातम्या

Atal Bihari Vajpayee: फोडाफोडीचे राजकारण..! अटलजींनी शरद पवारांना संसदेत दाखवला होता आरसा

Sandip Kapde

Sharad Pawar Politics: महाराष्ट्रातील घाणेरड्या राजकारणाची देशात चर्चा आहे. सत्तेसाठी राजकारणी नेत्यांनी लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. शरद पवार यांना राजकारणातील भीष्म पितामाह म्हटल्या जाते. मात्र पवारांना त्यांच्या पक्षातील नेत्यांनी दगा दिला. अजित पवार यांनी बंडाचे हत्यार उपसले. जवळपास ३६ आमदारांसह त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला.

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. बहुमत असताना देखील राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यामुळे भाजपवर देखील बदला'चे राजकरण केल्याची टीका होत आहे.

मात्र शरद पवार यांचे राजकारण काही अगदी स्वच्छ नाही. सांगायचे झाले तर राजकारणी सत्तेसाठी काहीही करु शकतात. अगदी ते नैतिकता, पक्षाची नीतिमूल्ये पायदळी तुडवतात. शरद पवारांच्या राजकारणाला देखील हीच पार्श्वभूमी आहे.

८ जुलैला शरद पवार यांनी नाशिक येथील पत्रकार परिषद माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत शरद पवार म्हणाले,  ‘ न टायर्ड हूं, न रिटायर्ड हूं।’, मला निवृत्त व्हायला सांगणारे ते (अजित पवार) कोण आहेत? मी अजूनही काम करू शकतो. (Sharad Pawar Politics)

आज भाजपवर जरी पक्ष फोडण्याचा आरोप होत असला तरी शरद पवार यांचा इतिहास देखील फोडाफोडीचा आहे. भाजपच्या राजकारणाचे समर्थन नाही. मात्र मी नव्हे त्यातला हे राजकारण आता राष्ट्रवादी काँग्रेसला देखील बदलण्याची गरज आहे. राजकारणाचे क्षेत्र देखील पृथ्वीसारखे गोल फिरते. सत्ता बदलते तशी राजकीय पक्षांची भूमिका देखील बदलते. अटलबिहारी वाजपेयी यांनी शरद पवार यांच्याबाबत १९९६ मध्ये लोकसभेत केलेले भाषण सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

लोकसभेत अटलजी म्हणाले होते, "माझ्यावर आरोप झाले आणि या आरोपाने माझे मन घायाळ केले. मला सत्तेचा लोभ असून गेल्या १० दिवसांत जे काही केले ते सत्तेच्या लालसेपोटीच केले आहे, असा आरोपही माझ्यावर करण्यात आला. थोड्याच वेळापूर्वी मी नमूद केले होते की मी ४० वर्षांपासून या सभागृहाचा सदस्य आहे. सदस्यांनी माझे वर्तन पाहिले आहे, माझे आचरण पाहिले आहे."

जनता दलाच्या मित्रांसोबत मीही सत्तेत राहिलो आहे. सत्तेच्या लालसेपोटी चुकीची कामे करायला आम्ही कधीच तयार झालो नाही. शरद पवार इथ बसलेले आहेत. (शरद पवार तेव्हा विरोधीपक्षनेते होते). मात्र माझे मित्र जसवंत सिंह भाषण देत होते तेव्हा शरद पवार इथे नव्हते. जसवंत सिंह सांगत होते की शरद पवारांनी आपला पक्ष कसा फोडला आणि आमच्यासोबत सरकार बनवले होते. त्यांनी ते सत्तेसाठी केले होत की महाराष्ट्राच्या भल्यासाठी, हा वेगळा विषय, पण त्यांनी पक्ष फोडून आम्हाला सहकार्य केले. मात्र मी असे कधीही केले नाही, असे अटलबिहारी वाजपेयी यांनी म्हटले होते.

अटलबिहारी वाजपेयी म्हणाले, "सभापती महोदय, मला कुणाचे नावं घ्यायची नाहीत. मला शरदजींचे नावही घ्यायचे नाही. पण पक्ष फोडून सत्तेसाठी नवी युती करून सत्ता माझ्या हातात आली तर अशा सत्तेला चिमट्यानेही हात लावायला मला आवडणार नाही. प्रभू राम म्हणाले होते की, मी मृत्यूला घाबरत नाही, जर मला भीती वाटत असेल तर मला बदनामीची भीती वाटते." अटलजींचे हे भाषण ऐकून घरातील सदस्य बराच वेळ टेबलावर थोपटत होते.

पुतण्याने खेळली काकांसारखी चाल-

सुमारे ४० वर्षांपूर्वी शरद पवार हे काँग्रेसविरोधात बंड करून जनता पक्षाच्या मदतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. शरद पवार ३८ वर्षातील सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले होते. जनता पक्षात भाजप म्हणजेच जनसंघाचाही समावेश होता. आता त्यांच्याच शैलीत पुतण्या अजित पवारांनी खेळ केला असून ते उपमुख्यमंत्री झाले आहेत.

शरद पवारांनी कशी फोडली होती काँग्रेस -

१८ डिसेंबर १९७७ मध्ये काँग्रेस पक्ष फुटला होता. काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले होते. काँग्रेस (इंदिरा) आणि यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांच्या नेतृत्वात काँग्रेस (S). असे दोन गट निर्माण झाले होते. तर शंकरराव चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्र समाजवादी पक्षाची स्थापना केली होती.

१९७८ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. यामध्ये काँगेस इंदीरा ६५ तर काँग्रेस S ला ६९ जागा मिळाल्या. तर जनता पार्टीला ९९ जागांवर विजय मिळाला. मात्र त्यांना सत्तेपासून दुर राहावं लागलं कारण दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या. काँग्रेस S च्या वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं तर काँग्रेस इंदीरा पक्षाच्या नाशिकराव तिरपुडे यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. या सरकारमध्ये शरद पवार यांना उद्योगमंत्र्यांची जबाबदारी देण्यात आली.

मात्र हे सरकार फार काही काळ टीकले नाही दोन्ही गटात मोठी धुसफूस होती. वसंतदादा यांनी सत्तेतून बाहेर पडण्याची इच्छा आमदारांसमोर व्यक्त केली. याप्रकरणी यशवंतराव चव्हाण यांच्याशी बोलण्याची जबाबदारी शरद पवार यांच्याकडे देण्यात आली होती. यशवंतराव चव्हाण यांना देखील आघाडी पटली नव्हती. अखेर काँग्रेस S मध्ये बंड झाले. काँग्रेस S चे दोन गट झाले. शरद पवार बाहेर पडले. त्यांच्यासोबत आबासाहेब कुलकर्णी, किसन वीर, प्रताप भोसले होते.

आबासाहेब कुलकर्णी यांनी जनता पक्षाचे सर्वेसर्वा चंद्रशेखर यांना फोन करत संपूर्ण परिस्थिती सामजावून सांगितली. शरद पवार यांनी या बंडाचं नेतृत्व केले होते. काही दिवसांनी शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, दत्ता मेघे यांनी राजीनामे दिले आणि सत्तेतून बाहेर पडले. यशवंतराव यांनी देखील शरद पवार यांची समजूत काढली पण पवारांनी मागे वळून पाहीलं नाही. पवारांना ३५ आमदारांचा पाठींबा होता. शरद पवार यांनी समांतर काँग्रेसती स्थापना केली. सर्व बंडखोर आमदारांना एका छताखाली आणलं. पवरांनी जनता पक्ष, शेकाप, कम्युनिस्ट नेत्यांना सुद्धा एकत्र आणले.

शरद पवारांनी पुलोदची (पुरोगामी लोकशाही दल) स्थापना केली. राज्यपालांना सत्ता स्थापनेसाठी प्रस्ताव दिला. १८ जुलै १९७८ रोजी शरद पवार यांच्यासह उत्तमराव पाटील, निहाल अहमद आणि सुंदरराव सोळंके यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शरद पवार वयाच्या 38व्या वर्षी राज्यातील सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले. यावेळी विरोधी बाकावर वसंतदादा पाटील आणि प्रतिभाताई पाटील होत्या.

पुढे १९८० मध्ये देशात इंदिरा गांधींचे सरकार स्थापन होताच त्यांनी शरद पवार यांचे सरकार बरखास्त केले आणि पुढच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले. ए.आर.अंतुले यांना काँग्रेसकडून मुख्यमंत्री करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT