Baramati Sharad Pawar Rally For Supriya Sule Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

Baramati Supriya Sule Rally: त्यामुळेच या फलकातून तो झळकवणाऱ्या तरुणाला, "पवार मोदींचे दुकाण बंद पाडणार," असे म्हणायचे असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत.

आशुतोष मसगौंडे

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यांतील 11 जागांवर मंगळवार दी. 7 रोजी मतदान होणार आहे. या अकरा जागांमध्ये महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या बारामती मतदारसंघाचाही समावेश आहे.

दरम्यान, तिसऱ्या टप्प्यांतील जागांवरील प्रचाराच्या तोफा 5 मे रोजी सायंकाळी थंडावल्या. त्यापूर्वी बारामती येथे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाची प्रचाराची सांगता सभा बारामतीत पार पडली.

दरम्यान या सांगता सभेला तरुणांपासून वृद्धांपर्यंत आणि तरुणींपासून वृद्ध महिलांपर्यंत सर्वांनी जोरदार प्रतिसाद दिला. या सर्व घडामोडीत एक तरुण सर्वांचे लक्ष वेधत होत. आणि आता याच तरुणाचा हातात फलक धरलेला फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (Sharad Pawar's Poster In Supriya Sule's Baramati Rally)

बारामतीतील या सभेला शरद पवार यांचे आगमन होण्यापूर्वी या तरुणाने सभेच्या ठिकाणी एक फलक झळकावला. ज्यावर लिहिले होते, "चहावाल्याच दुकान फक्त साखरवला बंद करू शकतो..."

या फलकातून तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्षपणे टोला लावला. कारण पंतप्रधान मोदी यांनी 2014 च्या लोकसभेच्या प्रचारात, त्यांनी लहाणपणी रेल्वे स्टेशनवर चहा विकला असल्याचे सांगितले होते.

दुसरीकडे शरद पवार हे देशातील सहकार क्षेत्रातील दिग्गज मानले जातात. आपल्या कारकिर्दीत पवारांनी अनेक साखर कारखाने चालवले आहेत.

त्यामुळेच या फलकातून तो झळकवणाऱ्या तरुणाला, "पवार मोदींचे दुकाण बंद पाडणार," असे म्हणायचे असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत.

ननंद-भावजय लढत ठरणार लक्षवेधी

दरम्यान, दरवेळीविजयची जबाबदारी स्वीकारणारे त्यांचे बंधू आणि शरद पवार यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ यंदा सुप्रिया सुळे यां ना असणार नाही. कारण यंदा अजित पवार यांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांनाच सुळे यांच्याविरोध मैदानात उतरवले आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरत आहे.

याचबरोब उमेदावर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या असल्या तरी खरी लढत ही शरद पवार आणि अजित पवार यांच्यात असणार आहे. त्यामुळे राज्याबरोबर देशाचेही लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये अजित पवार राज्यातील जवळपास 40 आमदारांना सोबत घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. यामध्ये शरद पवार यांच्या अत्यंत जवळच्या मानल्या जाणाऱ्या नेत्यांचाही समावेश होता.

तर दुसरीकडे शरद पवारांकडे काही मोजकेच आमदार आणि खासदार राहिले आहेत. त्यातच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांचे असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर काका आणि पुतण्यातील अंतर आणखी वाढले आहे. त्यामुळे आता बारामतीसह राज्यात कोणाची राष्ट्रवादी बाजी मारणार याची उत्सुकता जनतेला लागली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

Latest Marathi News Updates : अजित पवार यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांच्या देवगिरी बंगल्यावर फेऱ्या

SCROLL FOR NEXT