Sharad Pawar Resigns NCP Supremo Ajit Pawar retirement : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली आणि राज्यातील राजकीय विश्वात मोठी खळबळ उडाल्याचे दिसून आले. मुंबईतील वाय बी सेंटरमध्ये झालेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात पवारांनी व्यक्त केलेलं मनोगत हे अनेकांसाठी वेदनादायी ठरले आहे.
कार्यकर्त्यांना जेव्हा शरद पवारांचा निर्णय ऐकला तेव्हा मात्र त्यांना रडूच कोसळले. त्यांनी सभागृहामध्ये गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पवार साहेब आपण जो निर्णय घेतला आहे तो पुन्हा मागे घ्या, साहेब आम्हाला पोरकं करुन जाऊ नका. साहेब तुम्ही आम्हाला हवे आहात अशा प्रकारच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी सभागृह दणाणून सोडले होते. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी देखील यावेळी एक कमिटी नेमून पवार साहेबांच्या राजीनाम्याविषयी निर्णय घेतला जाईल. असे सांगण्यात आले.
कार्यकर्ते काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. यासगळ्यात मात्र राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेत्यांनी पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. तरीही घोषणाबाजी सुरुच होती. अखेर अजित पवारांनी पुन्हा एकदा माईकचा ताबा आपल्याकडे शरद पवारांनी जी घोषणा केली त्याच्या भूमिकेविषयी स्पष्ट केले. पवारांनी काही दिवसांपूर्वी भाकरी फिरवण्याबाबत एक विधान केले होते. तोच धागा पकडून अजित पवार यांनी आता नव्या नेतृत्वाला संधी देण्याची वेळ आली आहे. असे म्हटले आहे.
पवार साहेबांची जर नव्या नेतृत्वाकडे धुरा देण्याची इच्छा असेल तर तुमची त्यावर का हरकत घेता असा प्रश्न अजित पवारांनी विचारला. साहेब जसे म्हणतील तसेच होईल. तेव्हा कार्यकर्त्यांनी भावनिक न होण्याचे आवाहन केले. साहेब त्यांचा निर्णय मागे घेणार नाहीत. हे सांगताना कार्यकर्त्यांनी पवार साहेबांच्या वयाचा विचार करावा. असेही अजित पवार म्हणाले.
दुसरीकडे सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. पवार यांच्या राजकीय निवृत्तीबाबत अनेक प्रतिक्रिया दिल्या जात आहे. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये पवार यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा करणे हे अनेकांसाठी धक्कादायक गोष्ट होती. पवार यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करुन वेगळ्याच राजकीय चर्चांना सुरुवात करुन दिली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.