Sharad Pawar responded to Devendra Fadnavis on his statement on NCP in Nipani Karnataka election 2023  
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Vs Fadnavis : फडणवीसांविरुद्ध वस्ताद शरद पवारांनी ठोकला शड्डू; म्हणाले, निपणीत येऊन…

रोहित कणसे

कर्नाटक विधानसभा निवडणूकीचा प्रचाराचा आज (८ मे) शेवटचा दिवस असून १० तारखेल मतदान होणार आहे. या निवडणूकीत भाजप आणि काँग्रेससह इतर अन्य पक्षाकडून या निवडणूत जोरदार प्रचार केला आहे. महाराष्ट्रीत अनेक नेते देखील या प्रचारात सहभागी झाले आहेत.

दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकातील निपाणीत घेतलेल्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता. यावर शरद पवारांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे.

फडणवीस काय म्हणाले होते?

देवेंद्र फडणवीस यांची निपाणी येथील सभेत राष्ट्रवादीला साडेतीन जिल्ह्यातील पक्ष म्हटलं होतं. ते म्हणाले की , "महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्यांचा एक पक्ष आहे. या पक्षाने आता इथे कर्नाटकमध्ये त्यांचा एक उमेदवार दिला आहे. तो उमेदवार इथे (निपाणी) आहे. इथे येऊन हा पक्ष काय डोंबलं करणार? खरं म्हणजे ही यांची मिली जुली कुस्ती आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मिली जुली कुस्ती सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पार्सल पॅक करून पाठवून द्या, आम्ही पाहून घेऊ"

सोलापूर दौऱ्यावर आलेल्या पवारांना देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. शरद पवार म्हणाले की, आता मी चाललोय निपाणीला, त्यामुळे कोण पार्सल आहे, आणि कोण किती वस्ताद आहे, या सगळ्याबाबत तिथं बोलेन, इथं नाही. असं उत्तर पवारांनी दिलं. दरम्यान आज निपाणी येथे पोहचल्यावर शरद पवार फडणवीसांना काय उत्तर देतील याकडे लक्ष लागलं आहे.

शरद पवार काय बोलणार?

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा वाद मिटल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अॅक्शन मोडवर आहेत. सोलापूरचा दौरा संपवून ते आज निपाणी येथे पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ दाखल होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणूकीत ९ ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. दरम्यान निपाणीत देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर पवार काय बोलतील याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: डोंबिवलीत रवींद्र चव्हाण आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT