बारामती : ‘‘धनगर समाजाबांधवांची नवीन पिढी कर्तृत्ववान व यशस्वी कशी होईल, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे हेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे खऱ्या अर्थाने स्मरण असेल. निवृत्त पोलिस अधिकारी मधोजी शिंदे यांनी धनगर आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला असून, त्याला सर्वतोपरी मदत करू,’’ अशी ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली.
बारामतीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते. विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार व इतर सहकाऱ्यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित केला होता. अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज भूषणराजे होळकर, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आदी यावेळी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, ‘‘माझ्या सुरवातीच्या काळात धनगर समाजबांधव भक्कमपणे माझ्या सोबत उभे होते. बारामतीत अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभे करण्यासह भूषणराजे होळकर यांनी केलेल्या सूचनांबाबतही संबंधितांशी चर्चा करू.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.