sharad pawar and mamata banerjee sakal
महाराष्ट्र बातम्या

यूपीएच्या अध्यक्षपदावर शरद पवारांनी सोडलं मौन, तीन शब्दांत उत्तर!

Sharad Pawar : राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसने यासंदर्भात ठराव देखील आणला होता.

ओमकार वाबळे

Sharad Pawar : पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला सपाटून मार खावा लागल्यानंतर पक्षांतर्गत बदलाचे वारे वाहू लागते. यूपीएला नव्या चेहऱ्याची गरज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. काँग्रेसमध्येही यासाठी धूसफूस सुरू झाली. यावर राहूल गांधींपासून यूपीएतील अनेक पक्षांनी भाष्य केलं. शरद पवारांना यूपीएचं अध्यपद देण्याची मागणी काहींनी केली. (Sharad Pawar speaks on UPA president)

राष्ट्रवादीच्या युवक काँग्रेसने यासंदर्भात ठराव देखील आणला. मात्र पवारांनी अनेक दिवसांपासून यावर मौन बाळगलं होतं. अखेर आज कोल्हापुरात शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरण दिलंय.

मोदी आणि भाजपला शह देणारा कोणताही प्रबळ असा दावेदार आणि विरोधी पक्षच सध्या अस्तित्वात नसल्यामुळे विरोधकांच्या आघाडीबाबतची चर्चा सातत्याने डोकं वर काढताना दिसते. यूपीएचं नेतृत्व गांधी कुटुंबियांशिवाय अथवा काँग्रेसव्यतिरिक्त कुणीतरी करावं अथवा काँग्रेसशिवायच्या तिसऱ्या आघाडीच्या चर्चाही सातत्याने होता दिसतात. दुसरीकडे ममता बॅनर्जी मोदींना टक्कर देऊ शकतील, अशाही चर्चा डोकं वर काढताना दिसतात.

या संपूर्ण प्रकरणावर आता शरद पवार यांनीच मौन सोडलं आहे. मधल्या काळात आमच्या तरुणांनी ठराव केला की मी यूपीएचं अध्यक्षपद घ्यावं. पण मला या 'यत्किंचीत रस नाही', असं उत्तर शरद पवार यांनी दिलं आहे. मी यात पडणार नाही. ही जबाबदारी मी घेणार नाही, असं पवार यांनी स्पष्ट केलं. मात्र, सत्ताधाऱ्यांविरोधात कोणी एकत्र येऊन पर्याय देण्याचा विचार कोणी करत असेल, तर त्यांना सहकार्य शक्ती पाठिंबा आणि मदत देण्याची माझी तयारी आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं.

वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. सध्या ममता बॅनर्जी यांची मोठी शक्ती आहे. पण काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो राज्यात प्रत्येक ठिकाणी कमी अधिक आहे. जे पक्ष व्यापक आहेत. त्यांना घेऊन विस्तार करणं हे जास्त महत्वाचं आहे, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT