Sharad Pawar 
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Latest News : आज ठरणार महाविकास आघाडीचं भवितव्य! उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष; काँग्रेसने बोलवली तातडीची बैठक

Thackeray Shivsena : ठाकरे गटातील नेत्यांकडून सोमवारी ‘एकला चलो रे’ची भाषा केल्याने उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत राहणार की साथ सोडणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mumbai News : महाविकास आघाडीतील शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसलाही खिंडार पडल्याने शिवसेनेचा ठाकरे गट ‘एकला चलो रे’ च्या भूमिकेत राहणार की काँग्रेस आणि सत्तेतून बाहेर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटासोबत राहणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते.

तशीच परिस्थिती शरद पवारांवर ओढवल्यानंतर उद्धव ठाकरे शरद पवारांची साथ सोडणार की त्यांच्यासोबत लढा देणार, याबाबतचा निर्णय घेण्यासाठी ठाकरे गटाची बैठक शिवसेना भवन येथे पार पडणार आहे. या बैठकीला ठाकरे गटाचे सर्व नेते आमदार, खासदार आणि नेते उपस्थित असतील.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर साधारण वर्षभरातच राष्ट्रवादीत फूट पडल्याने आता महाविकास आघाडीचे भवितव्य अनिश्चित झाले आहे. ठाकरे गटातील नेत्यांकडून सोमवारी ‘एकला चलो रे’ची भाषा केल्याने उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीसोबत राहणार की साथ सोडणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

उद्या ठाकरे गटाच्या शिवसेना भवन येथे होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी स्थापन झाली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्यासाठी तयार केले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पडले आणि आता या आघाडीचे काय होणार असा प्रश्न वारंवार विचारला जाऊ लागला.

त्यातच आघाडीतील मतभेदही वारंवार समोर आले. ठाकरे गटाचे विधान परिषदेतील संख्याबळ घटल्याबरोबर राष्ट्रवादीकडूनही विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदाबाबत दावा पुढे रेटला जाऊ लागला होता.

त्यातच राष्ट्रवादीचेच आमदार फुटल्याने आणि ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याने आघाडीलाच खिंडार पडले आहे. त्यामुळे अशा दोलायमान स्थितीत उद्धव ठाकरे या बैठकीत नेमका काय निर्णय घेतात, हे पाहावे लागणार आहे.

उद्धव ठाकरे आपली भूमिका येत्या दोन दिवसांत स्पष्ट करतीलच. पण एक मात्र नक्की. महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला, शिवसैनिकांना असे वाटतेय की आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ‘स्वतंत्र चलो, अकेला चलो’ हा नारा द्यावा आणि पुढील राजकीय कामकाजात सहभागी व्हावे.

- विनायक राऊत, खासदार, ठाकरे गट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Breaking News: भोसरीत पाण्याची टाकी कोसळून पाच कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे धागेदोरे पुण्यापर्यंत; कर्वेनगरमधून अटक केलेल्या चौघांची नावे काय?

Vidhansabha Election 2024: "पुतण्याला पुढे करून काकांनी मिळवली उमेदवारी," सोशल मीडियावर नेमकी कुठल्या चुलत्याची चर्चा?

IND vs NZ: पुण्यात कोरड्या खेळपट्टीवर फिरकीचा बोलबाला? आजपासून भारत-न्यूझीलंड दुसरा कसोटी सामना

Family Shares Dispute: माजी मुख्यमंत्र्यांच्या घरात शेअर्सवरून वाद! आई-बहिणीविरुद्ध कायदेशीर लढाई, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT