Sharad Pawar: sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठीचा काय आहे महाविकास आघाडीचा प्लॅन? पवारांनी थेटच सांगितलं

Mahavikas Agadhi: नव्या पिढीतल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो असेही शरद पवार म्हणाले.

Chinmay Jagtap

Vidhansabha Election 2024: लोकसभेचे निकाल लागल्यापासून संपूर्ण राज्यांमध्ये एकच चर्चा आहे ती म्हणजे विधानसभा निवडणुकीची. येत्या काही महिन्यांमध्ये राज्याची विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे.

या निवडणुकीमध्ये राज्यात मोठ्या प्रमाणावर यश महाविकास आघाडीला मिळेल असे म्हटले जात आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याविषयी महत्त्वाचे विधान केले आहे.

आज पुण्यामध्ये शरद पवार पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, सध्या आमचे पूर्ण लक्ष हे विधानसभा निवडणुकीकडे आहे. ज्याप्रकारे अर्जुनाचे लक्ष हे पक्षाच्या डोळ्याकडे होते तसेच आमचं लक्ष हे उद्याच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीकडे आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे हे एकत्र निवडणूक लढवणार आहेत. जागा वाटपाची चर्चा लवकरच होणार असून सध्या आमच्या हातात तीन महिने आहेत. आमचे संपूर्ण लक्ष हे आगामी निवडणुकीकडे आहे.

तर दुसरीकडे आज पिंपरी चिंचवडच्या काही नगरसेवकांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, मला हल्ली रोज दोन ते तीन तास पक्षात येणाऱ्या नवीन लोकांना भेटायला वेळ द्यावा लागतो. नगरसेवकांनी आज भेट घेतली. येणाऱ्यांचं आम्ही स्वागत करतो. नव्या पिढीतल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो.

तर दुसरीकडे t20 वर्ल्ड कप भारत जिंकला याविषयी ते म्हणाले की , एकेकाळी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि आफ्रिका यांचं वेगळं स्थान होतं. अलीकडे भारतीय संघाने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आपण ही मॅच हरतो की काय असं वाटत होतं. मात्र गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. आपण t20 वर्ल्ड कप जिंकलो. राहुल द्रवीडने खेळाडूंना योग्य प्रकारचे मार्गदर्शन केले. यासाठी त्याचे आणि भारतीय संघाचे मनःपूर्वक अभिनंदन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT